बांगलादेश दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वनडे मालिकेतील अखेरचा सामन्यात मैदानावर उतरला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्मा याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल.
🚨 Toss Update 🚨
Bangladesh have elected to bowl against #TeamIndia in the third #BANvIND ODI
Follow the match 👉 https://t.co/HGnEqugMuM pic.twitter.com/gVQ4DXTbVi
— BCCI (@BCCI) December 10, 2022
भारतीय संघाला मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्याचे आव्हान संघासमोर असेल. चट्टोग्राम येथे होत असलेल्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केले गेले. दुखापतींमुळे मायदेशी परतलेले कर्णधार रोहित शर्मा व दीपक चहर यांच्या जागी ईशान किशन आणि कुलदीप यादव यांना संधी दिली गेली. दुसरीकडे, बांगलादेश नाही आपल्या संघात दोन बदल केले. वेगवान गोलंदाज तस्किन अहमद व अष्टपैलू यासिर अली चौधरी यांनी संघात पुनरागमन केले.
या मालिकेनंतर उभय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी होतील. कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबर पासून खेळला जाणार आहे.
तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.
तिसऱ्या वनडेसाठी बांगलादेश संघ-
अनामूल हक, लिटन दास (कर्णधार), शकीब अल हसन, यासिर अली, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराझ, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद.
(Bangladesh Won Toss And Elected To Field In 3rd ODI)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो अनुभवी कर्णधार नाही…’, केएल राहुलच्या नेतृत्वाबद्दल भारताच्या माजी सलामीवीराचे खळबळजनक वक्तव्य
महिला आयपीएलमधूनही उघडणार कुबेराचा खजाना! मिडीया राईट्ससाठी बीसीसीआयने केले टेंडर जारी