बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका बांगलादेशने 2-1 अशा अंतराने जिंकली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने सोमवारी (18 मार्च) 4 विकेट्सने विजय मिळवला. मालिका जिंकल्यानंतर बांगलादेश संघाकडून पुन्हा एकदा श्रीलंकेच्या जखमेवर मीठ चोळले गेले. दोन्ही संघ क्रिकेटविश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये या दोन संघांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सोमवारी मालिका जिंकल्यानंतर बांगलादेशने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले, त्याचा थेट संबंध वनडे विश्वचषकातील शाकीब अल हसन आणि अँजेलो मॅथ्यूज यांच्यातील वादाशी आहे.
आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा
वनडे विश्वचषक 2023 (ODI WOrld Cup 2023) मध्ये श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना चर्चेत राहिला. अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याला टाइम आउट दिले गेले होते. मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आउट होणारा पहिलाच क्रिकेटपटू होता. लाईव्ह सामन्यात मॅथ्यूज आणि बांगलादेशचा दिग्गज शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) यांच्यातील खडाजंगी सर्वांनी पाहिली होती. बांगलादेशच्या डावात मॅथ्यूजनेत शाकिबची विकेट घेतली आणि हातातील घडाळाकडे बोट दाखवले. कारण शाकिबनेच अपील केल्यामुळे पंचांनी मॅथ्यूजला टाइम आउट दिले होते. पंचांचा निर्णय नियमांना धरून होता. पण खेळ भावणा दुखावणारा ठरला होता.
Roar of the L̶i̶o̶n̶s̶ Tigers 🐅
P.S.: Don’t miss Mushfiqur’s celebration with the helmet.
.
.#ThatWinningFeeling #BANvSL #FanCode pic.twitter.com/UhPkvfeTMn— FanCode (@FanCode) March 18, 2024
श्रीलंका संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांतील तीन सामन्यांची टी-20 मालिका श्रीलंकने 1-2 अशा अंतराने जिंकली होती. मालिका विजयानंतर श्रीलंकने विश्वचषकातील वाद पुन्हा वर काढला. कारण ठरले त्यांना मालिका जिंकल्यानंतर केलेले टाइम आउट सेलिब्रेशन. सर्व खेळाडूंनी हाताच्या हडाळ्याकडे बोट दाखवत बांगलादेशी खेळाडूंना चिमटा काढला होता. याच कारणास्तव आता वनडे मालिका जिंकल्यानंतर बांगलादेशकडून देखील ‘ब्रोकन हेलमेट’ सेलिप्रेशन केले गेले. सोमवारी बांगलादेशने केलेहे हे सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनिभवी मुशफिकूर रहीम या व्हिडिओत मॅथ्यूजची नक्कील करताना दिसत आहे. इतर सर्व बांगलादेशी खेळाडू रहीमकडे पाहून हसत आहेत.
View this post on Instagram
THE CINEMA OF WORLD CRICKET.
– The Nagin Rivalry. 😄💪 pic.twitter.com/hiNpdUD0MD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 18, 2024
वनडे विश्वचषकात अँजेलो मॅथ्यूज टाइम आउट होण्याचे कारण ठरले होते त्याचे तुटलेले हेलमेट. हेलमेट तुटल्यामुळेच त्याने नवीन हेलमेट मागवले होते, ज्यामध्ये वेळ खर्च झाला. मॅथ्यूजला डावातील पहिला चेंडू दोन मिनिटांच्या आतमध्ये खेळता आला नाही, आणि शाकिबने त्याच्या विकेटसाठी अपील केली. पंचांना देखील नियमांना प्राधान्य देत मॅथ्यूजला वाद द्यावे लागले होते. तेव्हापासून सुरू झालेले हे सत्र अद्याप थांबलेला दिसत नाहीये. विशेष म्हणजे उभय संघांतील या वनडे मालिकेत मॅथ्यूज खेळत देखील नाहीये. (Bangladesh’s ‘broken helmet’ celebration, Mushfiqur mocks Mathews in response to time out)
महत्वाच्या बातम्या –
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! IPL 2024 पूर्वी विराट कोहलीनं सुरू केला सराव, व्हिडिओ व्हायरल
IPL 2024 । रोहितसाठी भावूक चाहत्यांबाबत हार्दिकचं मोठं विधान; म्हणाला, ‘…लक्ष देत नाही’