बांगलादेश क्रिकेट बोर्डाने गुरुवारी, ९ सप्टेंबरला संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. बांग्लादेशने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० मालिका विजयानंतर ही घोषणा केली आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत रियाध महमदुल्लाह बांगलादेशचे कर्णधारपद भूषवणार आहेत.
महमुदुल्लाह बांगलादेशचा सर्वात यशस्वी टी २० कर्णधार आहे. त्याने २६ पैकी १३ सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेदरम्यान, दिग्गज मशरफे मुर्तजाला मागे टाकले आहे, त्याने २०१४-१७ या कालावधीत २८ टी -२० सामन्यांमध्ये १० विजय मिळवले होते.
मार्च २०२० पासून या प्रकारात न खेळल्यामुळे तमीम इक्बालला टी -२० विश्वचषकामधून वगळण्यात आले. मोहम्मद नईम शेख, लिटन दास आणि सौम्या सरकार हे पहिल्या फळीसाठी पर्याय आहेत. मुशफिकूर रहिमने यष्टीरक्षण न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे नूरुल हसन सोहन स्पर्धेत यष्टीरक्षण करताना दिसण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, २०२० साली १९ वर्षाखालील विश्वचषकात बांगलादेशला विजय मिळवून दिल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शमीम हुसेन पटवारीचाही समावेश करण्यात आला आहे. मधल्या फळीत अफिफ हुसेन ध्रुबो आणि मेहेदी हसन यांचा समावेश आहे. २०२१ मध्ये शाकिब अल हसन फार काही करू शकला नाही, पण झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याला त्याचा फॉर्म सापडला. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकावीरही बनला. डावखुऱ्या मुस्तफिझूर रहमानला फिरकीला अनुकूल परिस्थिती हाताळण्यासाठी खास निवडले गेले आहे.
तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम आणि मोहम्मद सैफुद्दीन हे संघातील वेगवान गोलंदाज आहेत. लेग स्पिनर अमीनुल इस्लाम बिप्लब यांच्यासह रुबेल हुसेनचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. मोसादडेक हुसेनला संघात स्थान मिळाले नाही.
टी -२० विश्वचषकासाठी बांगलादेश संघ
महमुदुल्लाह रियाध (कर्णधार), मोहम्मद नईम शेख, सौम्या सरकार, लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ हुसैन ध्रुबो, नुरुल हसन सोहन, माहेदी हसन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, शोरफुल इस्लाम, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन, शमीम हुसेन
राखीव खेळाडू: रुबल हुसेन, अमीनुल इस्लाम बिप्लोबी
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! टीम इंडियाचा आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, सराव सत्र झाले रद्द
सलामीला रोहितसह विराट करणाल फलंदाजी? मुख्य निवडकर्त्यांनी दिलं उत्तर
टी२० विश्वचषकासाठी अनुभवी चहलला का मिळाले नाही टीम इंडियात स्थान, मुख्य निवडकर्त्यांनी केले स्पष्ट