बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने शतक केले आहे.
त्याने आज वेळा आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याच्या तिसऱ्या सत्रात चौकार ठोकत शतक साजरे केले. हे त्याचे कसोटीतील 12 वे शतक आहे.
त्याने आज 153 चेंडूत 105 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 1 षटकार मारले आहे.
तसेच या सामन्यात पहिल्याच दिवशी शतक करणारा दुसरा फलंदाज आहे. आज शिखर धवनने दिवसाच्या पहिल्या सत्रातच शतक पूर्ण केले होते.
सामन्याच्या एकाच डावात शिखर आणि विजयने शतक करण्याची ही तिसरी वेळ आहे. याचबरोबर भारताच्या सलामीला येऊन सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये विजय तिसरा खेळाडू आहे.
भारताच्या सलामीला येऊन सर्वाधिक शतके करणारे खेळाडू:
सुनिल गावस्कर- 33 शतके
विरेंद्र सेहवाग – 22 शतके
मुरली विजय – 12 शतके
गौतम गंभीर – 08 शतके
महत्त्वाच्या बातम्या:
–फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग
–इंग्लंड क्रिकेटच्या चाहत्यांमुळे अाॅस्ट्रेलियन खेळाडू वैतागले
–सचिन, गेलनंतर अशी कामगिरी करणारी ती ठरली तिसरीच क्रिकेटपटू