भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा तिसरा कसोटी सामना इंदोर येथे सुरू झाला. बुधवारी (1 मार्च) सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघावर वर्चस्व गाजवत आघाडी घेतली. भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात केवळ 109 धावा करता आल्या. भारतीय संघाच्या फलंदाजांंकडून आपल्याला अशी अपेक्षा नव्हती असे मत फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केले.
भारतीय संघ अनपेक्षितरित्या पहिल्या दिवशीच्या दीड सत्रातच 109 धावांवर गारद झाला. संघाच्या याच खराब कामगिरीविषयी बोलताना विक्रम राठोड म्हणाले,
“ही खेळपट्टी नक्कीच आव्हानात्मक आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चेंडू येथे स्पिन झाला. आपले फलंदाज अशा वातावरणात खेळण्यासाठी तयार असतात. मात्र, असे काही होईल याची अपेक्षा नव्हती. कोणावर दोष देता येणार नाही. मात्र, हा एक निराशाजनक दिवस होता.”
मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर हा सामना जिंकण्याचे इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्याच षटकात रोहितला दोन जीवदान मिळाली. परंतु, तो याचा फायदा घेऊ शकला नाही. सहाव्या षटकात तो बाद झाला. त्यानंतर भारताचे फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतू लागले. भारताने 45 धावांवर आपले पाच फलंदाज गमावले होते.
त्यानंतर विराट कोहली व केएस भरत यांनी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते देखील पहिल्या सत्रातच बाद होऊन परतले. विराटने सर्वाधिक 22 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला उमेश यादवने काही आक्रमक फटके खेळत भारताला 100 धावांच्या पार नेले. मात्र, त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाने यजमान संघाचा डाव 109 धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियासाठी कुन्हेमनने पाच फलंदाज बाद केले. तर, लायनने तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर उस्मान ख्वाजा याच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 बाद 156 अशी मजल मारत 47 धावांची आघाडी घेतली आहे.
(Batting Coach Vikram Rathour Not Happy With Indian Batters Performance In Indore Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: लग्नाच्या बेडीत अडकलेल्या शार्दुलचा पत्नीसाठी झक्कास उखाणा; म्हणाला, ‘बॉलिंग करतो क्वीक…’
थेट ‘सिक्सर किंग’ युवीला पछाडत उमेश ‘स्पेशल’ यादीत! रवी शास्त्रींचा पराक्रमही ध्वस्त