भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सर्वोच्च समितीने स्पष्ट केले आहे की बर्मिंघम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेट क्रिकेट संघ सहभागी होणार आहे. त्याच्या सोबतच हा निर्णय देखील घेण्यात आला आहे की २०२८ साली लॉस अँजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला तर या स्पर्धेसाठी महिला आणि पुरुष असे दोन संघांना पाठवण्यास येईल.
आभासी भरवल्या गेलेल्या बीसीसीआयच्या बैठकीत मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली महिला संघ २०२१ च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. यानंतर न्यूझीलंडचा दौरा पण महिला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी होईल असेही यावेळी सांगण्यात आले. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती पीटीआयला दिली आहे.
त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की, “महिला संघ बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत खेळेल. २०२८ लॉस अँजलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यास पुरुष व महिला दोन्ही संघ यात सहभागी होतील.”
मागील वर्षाप्रमाणेच यंदाही आयपीएलदरम्यान तीन महिला संघ टी२० चॅलेंज स्पर्धा खेळतील आणि त्यानंतर लवकरच भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल. ते पुढे म्हणाले, “महिला संघ इंग्लंडमध्ये तीन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका खेळतील. तेथून परतल्यावर विंडीज किंवा दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ पुन्हा द्विपक्षीय मालिकेसाठी भारतात येतील. यानंतर भारतीय महिला संघ मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाईल आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये आणखी एक मालिका खेळेल. न्यूझीलंडविरुद्ध वनडे विश्वचषकापूर्वी द्विपक्षीय मालिका किंवा तिरंगी मालिका होईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
संपूर्ण यादी: आत्तापर्यंत ‘हे’ १२ क्रिकेटर आयपीएलमध्ये झाले आहेत हिट विकेट; जडेजा, युवराजचाही समावेश
केवळ अविश्वसनीय! एकाच सामन्यात हार्दिकचे दोन जबरदस्त रनआऊट, पाहा व्हिडिओ