भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (25 जुलै) 2023-24 च्या घरगुती मालिकांसाठीच्या स्थळांची घोषणा केली. या आगामी हंगामात वरिष्ठ पुरुष संघ 5 कसोटी, 3 वनडे आणि 8 टी20 असे एकूण 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.अमिताभ विजयवर्गीय, जयेंद्र सहगल आणि हरी नारायण पुजारी यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या टूर्स, फिक्स्चर आणि तांत्रिक समितीने बीसीसीआयच्या व्हेन्यू रोटेशन धोरणानुसार या ठिकाणांची पुष्टी केली.
आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषकापूर्वी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येईल. ही मालिका मोहाली, इंदूर आणि राजकोट येथे होणार आहे. 50 षटकांच्या विश्वचषकानंतर, भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20Iमालिका खेळणार आहे, जी 23 नोव्हेंबरपासून विझाग येथे सुरू होईल आणि 3 डिसेंबर रोजी हैदराबाद येथे संपेल.
NEWS – BCCI announces fixtures for International Home Season 2023-24.
The Senior Men's team is scheduled to play a total of 16 International matches, comprising 5 Tests, 3 ODIs, and 8 T20Is.
More details here – https://t.co/SefiALgDSp… #TeamIndia pic.twitter.com/7K4YXuodmA
— BCCI (@BCCI) July 25, 2023
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अफगाणिस्तानचा संघ त्यांच्या पहिल्या मर्यादित षटकांच्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी भारतात येणार आहे. तीन सामन्यांची ही टी20 मालिका मोहाली, इंदोर व बेंगळुरू येथे होणार आहे.
यानंतर 25 जानेवारी 2024 पासून सुरू होणार्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत इंग्लंडचे यजमानपद भूषवेल. हैदराबाद, विझाग, राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे ही रोमांचक कसोटी मालिका खेळवली जाईल.
या कार्यक्रमांमध्ये अशा शहरांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला गेला आहे, ज्यांना विश्वचषकातील सामने मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याची संधी दिली नाही. मोहाली, इंदोर, राजकोट विझाग व रांची येथे विश्वचषकातील कोणतेही सामने होणार नाहीत. यानंतर भारतीय संघ जून 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात सहभागी होईल.
(BCCI Annouced Fixtures For International Home Season 2023-2024)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा फेरबदल! मिसबाह उल हकची पीसीबीमध्ये पुन्हा एन्ट्री
लवकरच जन्माला येणार बेबी मॅक्सवेल! भारतीय संस्कृतीनुसार पार पडले विनी रमनचे डोहाळे जेवण