---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध चेन्नईत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराटसह ‘या’ खेळाडूंचे पुनरागमन

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 7:48 PM
---Advertisement---

भारताने मंगळवारी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाला २-१ अशा फरकाने पराभूत करत जिंकली. आता भारतीय संघ मायदेशात ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने चेन्नईत तर शेवटचे 2 सामने अहमदाबाद येथे होतील. त्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी(१९ जानेवारी) बीसीसीआयने केली आहे.

या संघात नियमित कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी दुखापतग्रस्त झालेल्या इशांत शर्माचेही संघात पुनरागमन झाले आहे. याबरोबरच अक्षर पटेल या फिरकीपटूला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच या संघात अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्यानेही पुनरागमन केले आहे.

याशिवाय नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेल्या रविंद्र जडेजा, हनुमा विहारी, मोहम्मद शमी, उमेश यादव अशा काही प्रमुख खेळाडूंना इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे.  त्याचबरोबर पृथ्वी शॉला मात्र त्याच्या खराब फॉर्मचा फटका बसला आहे. त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.

याबरोबरच बीसीसीआयने ५ नेट गोलंदाज आणि ५ राखीव खेळा़डूंचीही निवड केली आहे. नेच गोलंदाजांमध्ये  अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम आणि सौरभ कुमार यांचा समावेश आहे. तसेच केएस भरत, अभिमन्यू इश्वरन, शहाबाज नदीम, राहुल चाहर आणि प्रियांक पांचाल यांचा राखीव खेळाडूंचा समावेश आहे.

भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथे अनुक्रमे ५ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारीपासून सुरु होतील. यातील पुढील दोन सामने अनुक्रमे ४ मार्च आणि १२ मार्चपासून अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांसाठी भारतीय संघ – 

रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदिप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.

नेट गोलंदाज – अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, सौरभ कुमार

राखीव खेळाडू – केएस भरत, अभिमन्यू इश्वरन, शहाबाज नदीम, राहुल चाहर, प्रियांक पांचाल

कसोटी मालिकेचे वेळापत्रक – 

पहिला कसोटी सामना- ५-९ फेब्रुवारी २०२१ (चेन्नई)
दुसरा कसोटी सामना-  १३-१७ फेब्रुवारी २०२१ (चेन्नई)
तिसरा कसोटी सामना- २४-२८ फेब्रुवारी २०२१ (अहमदाबाद)
चौथा कसोटी सामना- ४-८ मार्च २०२१ (अहमदाबाद)

महत्त्वाच्या बातम्या –

विलक्षण योगायोग! बाप विराटच्या आणि आता लेकीच्या जन्मावेळीही घडलाय तोच इतिहास; जाणून घ्या

केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही तर इंग्लंडच्या या फुटबॉलपटूकडूनही टीम इंडियाला मिळाल्या शुभेच्छा

ब्रिस्बेन कसोटी जिंकत ‘त्या’ नकोश्या विक्रमाला टीम इंडियाने पाडला खंड, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---