बीसीसीआयने गुरवारी देशांतर्गत क्रिकेटच्या वेळापत्रकाची घोषणा केली. यंदाच्या 2024-25 च्या सत्राला 5 स्पटेंबर पासून दिलीप ट्राॅफीने होणार आहे. बीसीसीआय ने 2024-25 हंगमासाठी वेळापत्रक जाहीर केला आहे. जो खेळाडूंच्या भविष्याला प्राधान्य देताना देशांतर्गत क्रिकेटचा गाभा मजबूत करण्यासाठी अनेक घटक लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.
या सत्राची सुरुवात दिलीप ट्राॅफीने होणार आहे. वरिष्ठ पुरुष निवड समितीने निवडलेले चार संघ अनंतपूर येथे 5 सप्टेंबरपासून सुरुवात करतील. त्यानंतर ईराणी कप आणि रणजी ट्राॅफीचे पाच साखळी सामने होतील. त्यानंतर एकदीवसीय सामन्यांची स्पर्धा ज्यामध्ये सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्राॅफीने सुरुवात होईल. रणजी ट्राॅफीच्या शेवटच्या दोन साखळी सामन्यानंतर पुन्हा सुरु होईल, ज्याचा शेवट बाद फेरीत होईल.
🚨 News 🚨
BCCI announces domestic fixtures for home season 2024-25
Read 🔽https://t.co/iMcwnUi78L@IDFCFIRSTBank pic.twitter.com/p6TLTGGzm0
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 6, 2024
देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक ठरवताना बीसीसीआयने खेळाडूंचे कल्याण, महिला क्रिकेट आणि इतर महत्त्वाच्या स्पर्धांना प्राधान्य दिले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘खेळाडूंच्या तंदुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी, सामन्यानंतर रिकव्हरीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सामन्यांमध्ये ठरावीक दिवसांचा आंतर ठेवला आहे. ज्यामुळे आणि उच्च कामगिरीसाठी पुरेसा कालावधी मिळू शकेल.’ यासोबतच सी के नायडू ट्राॅफीमध्ये चांगले प्रदर्शनच्या उद्देशासाठी एक सुधारित अंक प्रणाली असणार आहे.
पहिल्या डावात फलंदाजी आणि गोलंदाजी कौशल्यासाठी तसेच पहिल्या डावात आघाडी घेतल्याबद्दल किंवा विजयासाठी गुण दिले जाणार आहेत. एक ऐतिहासिक निर्णय घेत शाह म्हणाले, सी के नायडू ट्राॅफीसाठी खेळले जाणाऱ्या सामन्यांसाठी टाॅस होणार नाही. त्याऐवजी पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचा विशेषाधिकार दिला जाईल.
महिला क्रिकेटला प्रधान्या देण्यासाठी बीसीसीआय यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत महिला चॅलंंजर ट्राॅफीचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये निवडकर्ते आपल्या संघाची निवड करतील. शेवटच्या वेळी झालेली चॅलेंजर ट्राॅफी 2021-22 वनडे रुपात आणि 2022-23 मध्ये टी20 स्वरुपात झाली होती. या ट्राॅफीचे मुख्या उद्देश आंतरराष्ट्रीय संघा व्यतीरिक्त डाॅमेस्टीक स्तरावर देखील खेळाडूचे भविष्य निर्माण करण्यासाठी, आणि मजबूत अंडर-19 संघ तयार करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
महान फुटबॉलपटू सुनील छेत्रीला भारतीय संघाचा निरोप; शेवटच्या सामन्यात मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’!
न्यूयॉर्कपासून बांग्लादेशपर्यंत! पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद जगभरात साजरा; VIDEO व्हायरल
पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर चाहत्याशी भिडला पाकिस्तानी क्रिकेटपटू, पाहा व्हिडिओ