भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुढील वर्षीपासून महिला आयपीएल सुरू करत आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेच्या 2023 ते 2027 या हंगामांसाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे मीडिया राईट्स देण्याची घोषणा केलीये. या प्रक्रियेसाठी टेंडर देखील जारी करण्यात आले आहे.
पात्रता आवश्यकता, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित मीडिया हक्क पॅकेज आणि दायित्वे इत्यादींसह निविदा प्रक्रियेचे संचालन करणाऱ्या तपशीलवार अटी व शर्ती ‘निविदेचे आमंत्रण’ (ITT) मध्ये समाविष्ट आहेत. यासाठी इच्छुकांना पाच लाख रुपयांची ही पावती खरेदी करावी निविदा खरेदी करण्याची अखेरची तारीख 31 डिसेंबर 2022 असेल. त्याचवेळी ही ITT खरेदी करणारा व्यक्ती अथवा कंपनी तितकीच सक्षम असणे देखील गरजेचे आहे. महिला आयपीएलच्या मीडिया राइट्समधून किती कमाई होते हे पाहणे रंजक ठरेल.
🚨NEWS🚨:
BCCI Announces Release Of Invitation To Tender For Media Rights To The Women’s Indian Premier League Seasons 2023-2027.
More details 👇https://t.co/wAudbmAVBz
— IndianPremierLeague (@IPL) December 9, 2022
बीसीसीआय पुरुष आयपीएल मधून तगडी कमाई करताना दिसतो. जून महिन्यातच आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठी मीडिया राइट्सचा लिलाव झाला होता. त्यामध्ये तीन कंपन्यांनी मिळून 48,390 कोटी रुपयांना हे लिलाव घेतलेले. बीसीसीआयने एबीसीडी अशा चार प्रकारे हे लिलाव वितरित केलेले. 2023 ते 2027 या कालखंडात भारतीय उपखंडातील टीव्ही राइट्स स्टार स्पोर्ट्सने आपल्या नावे केलेले. तर वायकॉमने 20,500 कोटींमध्ये ऑनलाईन स्ट्रीमिंग राइट्स मिळवले. त्याबरोबरच पॅकेज सी म्हणजे सलामीचा सामना, 13 डबल हेडर व 4 प्ले ऑफ हे देखील वायकॉमने 3,228 कोटींना तर, पॅकेज डी म्हणजेच वर्ल्ड मीडिया राइट्स वायकॉम व टाईम्स यांनी 1,057 कोटींना आपल्या नावे केलेले. अशा रीतीने 48,390 कोटी रुपये बीसीसीआय पुरुष आयपीएलमधून पुढील पाच वर्षात कमावताना दिसेल.
(BCCI Announces Release Of Invitation To Tender For Media Rights To The Women’s Indian Premier League Seasons 2023-2027)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर कडाडून टीका; म्हणाला, ‘आयपीएलचा विचार सोडा, देशाचा विचार करा’
टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ परिस्थिती; कधी, कुठे आणि कसा पाहता येईल शेवटचा वनडे सामना?