---Advertisement---

महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2020 3:45 PM
---Advertisement---
बीसीसीआयने आज(११ ऑक्टोबर) महिला टी२० चॅलेंजचे अर्थात महिला आयपीएलचे वेळापत्रक घोषित केले आहे. तसेच ३ संघांचीही घोषणा करण्यात आली आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधना आणि मिताली राज अनुक्रमे सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर्स आणि वेलोसिटी संघाच्या कर्णधार असतील.ही स्पर्धा आयपीएलच्या प्ले ऑफ दरम्यान युएईमध्येच ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे, ४,५ आणि ७ नोव्हेंबरला साखळी फेरीचे सामने होतील. तर ९ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. असे असले तरी अजून हे सामने कोणत्या मैदानावर खेळवले जाणार आहेत, याबद्दल बीसीसीआयने माहिती दिलेली नाही.या स्पर्धेतील सर्व सामन्यांना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.

पहिला सामना गतविजेत्या सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी संघात ४ नोव्हेंबरला होईल, तर वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स असा ५ नोव्हेंबरला दुसरा सामना होईल. तिसरा सामना ७ नोव्हेंबरला सुपरनोवा विरुद्ध ट्रेलब्लेझर्स यांच्यात होईल. यानंतर गुणतालिकेतील पहिल्या २ संघात ९ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल.

या स्पर्धेसाठी अखिल भारतीय महिला निवड समितीने प्रत्येक संघात १५ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये प्रत्येक संघात ४ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंचाही समावेश आहे. यंदा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा या स्पर्धेत समावेश नाही. कारण या स्पर्धेदरम्यान म्हणजेच २५ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये महिला बिग बॅश लीग होणार आहे.

माध्यमांतील काही वृत्तांनुसार महिला आयपीएलसाठी भारतीय महिला खेळाडू १३ ऑक्टोबरला मुंबई येथे पोहोचणार आहेत. तिथे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. दरम्यान त्यांच्या अनेक कोरोना चाचण्या होणार आहेत. त्यानंतर २२ ऑक्टोबरला सर्व खेळाडू युएईला जाण्यासाठी रवाना होतील. त्यानंतर तिथेही ६ दिवसांसाठी त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तिथे सर्व खेळाडूंची आरटी पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल.

महिला आयपीएलचे असे आहेत संघ – 

सुपरनोवाज –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक

ट्रेलब्लेझर्स – 

स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम

वेलोसिटी –

मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिष्त, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, ले कास्पेरेक, डॅनियल व्याट, सुने लुस, जहानारा आलम , एम. अनघा.

वेळापत्रक – 

४ नोव्हेंबर – सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी – वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

५ नोव्हेंबर – वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स – वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

७ नोव्हेंबर – ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवा – वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

९ नोव्हेंबर – अंतिम सामना – वेळ : संध्याकाळी – ७.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

महत्त्वाच्या बातम्या – 

…आणि हार्दिक पंड्याने सचिनची भविष्यवाणी खरी करुन दाखवली

पाचव्या पराभवानंतर एमएस धोनीचा चेन्नई संघ झाला जोरदार ट्रोल; पाहा काही खास ट्विट्स

व्वा रे पठ्ठ्या! फक्त ३५ चेंडूत झळकावले शतक, ८ वर्षांनी ‘त्या’ विक्रमावर कोरले नाव

ट्रेंडिंग लेख – 

‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज

आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---