---Advertisement---

आरसीबीच्या स्टार खेळाडूवर बीसीसीआयची मोठी कारवाई! फायनलमध्ये केलेल्या ‘या’ कांडामुळे मिळाली शिक्षा

On: मंगळवार, जून 2, 2026 6:41 AM
---Advertisement---

आयपीएल 2026च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवत, सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपदावर आपले नाव कोरले. आरसीबीच्या या विजेतेपदानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच, बीसीसीआयने त्यांच्या एका धडाकेबाज फलंदाजावर टिम डेव्हिडवर महत्त्वपूर्ण कारवाई केली. नेमके सांगायचे तर, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026च्या अंतिम सामन्यादरम्यान, पंच नितीन मेनन यांच्या दिशेने ‘आईस पॅक’ फेकल्याप्रकरणी टिम डेव्हिडवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. या शिक्षेचा परिणाम म्हणून, त्याला आयपीएल 2027 च्या हंगामातील पहिला सामना खेळता येणार नाही.

एका अधिकृत निवेदनात बीसीसीआयने म्हटले आहे की, “आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी टिम डेव्हिडवर त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, त्याच्या शिस्तभंगाच्या नोंदीमध्ये दोन ‘डिमेरीट पॉइंट्स’ जोडण्यात आले आहेत. आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.9 चे उल्लंघन केल्याचा टिम डेव्हिडवर दोष सिद्ध झाला आहे. हे कलम सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूच्या, पंचांच्या किंवा सामना अधिकाऱ्याच्या दिशेने चेंडू अथवा क्रिकेटशी संबंधित इतर कोणतेही साहित्य (उदा. पाण्याची बाटली) अयोग्य किंवा धोकादायक पद्धतीने फेकण्याशी संबंधित आहे. ही घटना पहिल्या डावाच्या 10व्या षटकादरम्यान घडली. जेव्हा एक गडी बाद झाल्यानंतर, डेव्हिडने संतापाच्या भरात पंच नितीन मेनन यांच्या दिशेने आईस पॅक फेकला होता.”

टिम डेव्हिडने आपली चूक कबूल केली असून, सामना पंच जवागल श्रीनाथ यांनी सुनावलेली शिक्षा त्याने मान्य केली आहे. या हंगामातील टिम डेव्हिडची ही तिसरी चूक ठरली. यापूर्वी, 20व्या सामन्यादरम्यान त्याच्या खात्यावर 1 डिमेरिट पॉइंट आणि 54व्या सामन्यादरम्यान 2 डिमेरिट पॉइंट्स जमा झाले होते. आता त्याच्या खात्यावर एकूण 5 डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यामुळे, त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. या शिक्षेचा परिणाम म्हणून, टिम डेव्हिडला पुढील आयपीएल हंगामाचा (IPL 2027) पहिला सामना खेळता येणार नाही मग तो आरसीबीकडून खेळत असो किंवा इतर कोणत्याही संघाकडून.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---