भारताचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये असले, तरी आता त्यांच्याविषयी महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. बीसीसीआय लवकरच सेंट्रल कॉन्ट्रॅक्सची (bcci central contracts) घोषणा करणार आहे. ज्याद्वारे खेळाडूंना मिळणारे वार्षिक वेतन ठरवले जाते. अशात यावर्षी अजिंक्य आणि पुजारा यांच्या वेतनात घसरण होण्याची पूर्ण शक्यता आहे. तसेच, रिषभ पंत (rishabh pant) आणि केएल राहुल यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचे चार भाग पडतात. सर्वात वर ए प्लस, दुसऱ्या क्रमांकावर ए, तिसऱ्या क्रमांकावर बी, तर शेवटी सी. वार्षिक वेतनाचा विचार केला, तर ए प्लसमधील खेळाडूंना वार्षिक सात कोटी रूपये मिळतात. ए मधील खेळाडूंना पाच कोटी, बी मधील खेळाडूंना तीन कोटी आणि सी मधील खेळाडू वर्षाला एक कोटी रूपये मोबदला घेतात. शक्यतो बोर्डच तीन अधिकारी, पाच निवडकर्ते आणि राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक या ‘रिटेनरशिप’ प्रक्रियेचा निर्णय घेतात.
बीसीसआयच्या एका वरिष्ठ सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “निश्चितच सर्व प्रकारांमधील तीन महत्वपूर्ण खेळाडू रोहित, कोहली आणि बुमराह निःसंशयपणे ए प्लस कॅटेगरीमध्ये कायम राहतील. परंतु, राहुल आणि पंत देखील सर्व प्रकारांमधील नियमित खेळाडूंच्या रूपात स्वतःला सिद्ध करत आहेत. त्यामुळे हे पाहावे लागेल की, या दोघांना प्रमोशम मिळेल की नाही.”
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यामुळे पुजारा आणि रहाणेला ग्रुप ए मध्ये ठेवले जाऊ शकते. परंतु, सध्याचे त्यांचे प्रदर्शन पाहता ते ग्रुप ए मधून बाहेर देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे इशांत शर्मा आणि हार्दिक पांड्या मागच्या संपूर्ण वर्षात दुखापत आणि खराब फॉर्ममुळे ग्रुप बी मध्ये सामील होऊ शकतात. मागच्या वर्षी ग्रुप बी मध्ये असलेल्या शार्दुल ठाकुरने कसोटी सामन्यात कौतुकास्पद प्रदर्शन केले. त्यामुळे शार्दुल यावर्षी ग्रुप ए मध्ये सामील होऊ शकतो. मोहम्मद सिराज मागच्या वर्षी सी ग्रुपमध्ये होता आणि त्यानेही चांगली कामगिरी केली आहे. अशात सिराजही यावर्षी कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रगती करू शकतो.
हे खेळाडू सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत सहभागी
ग्रेड ए प्लस : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
ग्रेड ए : रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पंड्या
ग्रेड बी : ऋद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, मयंक अग्रवाल
ग्रेड सी : कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज
महत्वाच्या बातम्या –
गुजरात-थलाईवाज सामन्याने गाठली रोमांचकतेची परिसीमा! सुपर-सब प्रवीणच्या सुपर रेडने जायंट्स विजयी
विराट-बीसीसीआय वाद सुरूच! गांगुली बजावणार होते कोहलीला कारणे दाखवा नोटीस
पहिल्या सामन्यातील पराभवासाठी राहुलने ‘या’ खेळाडूंना ठरविले दोषी; म्हणाला…
व्हिडिओ पाहा –