भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआय आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. वास्तविक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध बीजीटी मालिकेत 3-1 अश्या पराभवाला सामोरे जावे लागले. या दरम्यान संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी वैयक्तिक गाडीने प्रवास केला होता. आता याबाबत बीसीसीआयने आढावा बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआय, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यात शनिवारी 11 जानेवारीला मुंबईत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडूंबाबत कठोर नियम तयार केले आहेत.
बोर्डाने आता खेळाडूंची कामगिरी चांगली नसल्यास त्यांच्या पगारात कपात करण्यापासून ते दौऱ्यात कुटुंबियांना सोबत राहण्या पर्यंतचे नवे नियम लादले आहेत. यावरुन असे चित्र दिसते की, खेळाडूंवर इथून पुढे अनेक प्रकारचे निर्बंध लादले जयाण्याची शक्यता आहे. या नियमाचे खेळाडूंनी पालन केल्यास भारतीय संघात सुधारणा होऊ शकते. असा बोर्डाचा विश्वास आहे. चला तर या बातमीद्वारे पाहुयात की, बीसीसीआयचे नवीन नियम काय आहेत.
वेतन कपात प्रणाली लागू होण्याची शक्यता
बीसीसीआयच्या आढावा बैठकीत काही मोठे निर्णय झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ज्यामध्ये खेळाडूंची चांगली कामगिरी नसल्यास त्यांच्या पगारातून कपात केली जाईल असा निर्णय घेण्यात आला. ज्याचा उद्देश असा असेल की खेळाडूंना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी जबाबदार राहावे लागणार आहे. कामगिरीत कमीपणा जाणवला तर पगारात पण कमीपणा जाणवेल.
पत्नी व कुटुंब जास्तीत जास्त 2 आठवडे खेळाडूंसोबत राहू शकतील
भारतीय क्रिकेट बोर्डाने ज्याप्रकारे पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे आणखीन एक मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियासोबत ठेवण्याबाबत. जर टीम इंडिया दौऱ्यावर गेली आणि तो दाैरा 45 दिवसांच्या पुढे असेल तर दौऱ्यात त्यांचे कुटुंब जास्तीत जास्त 2 आठवडे राहू शकतील. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला यापेक्षा जास्त काळ एकत्र राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
त्याचबरोबर आणखी एक मुद्दा असा आहे की, टीम इंडियाच्या खेळाडूंना दौऱ्यावर संघ बसनेच प्रवास करावा लागेल. कोणत्याही खाजगी बसने त्यांना प्रवास करता येणार नाही. अशा प्रकारे बोर्डाने भारतीय खेळाडूंवर कठोर निर्णय लादले आहेत.
हेही वाचा-
‘जसप्रीत बुमराहशी माझी तुलना करू नका’, कपिल देव यांची मोठी प्रतिक्रिया, वर्कलोड मॅनेजमेंटवरही सुनावले
इंग्लंड मालिकेपूर्वी नितीश रेड्डी तिरुपती मंदिरात, गुडघ्यावर पायऱ्या चढले; पाहा VIDEO
664 ची सरासरी, 5 शतके! विजय हजारे स्पर्धेत स्टार खेळाडूचा धुमाकूळ, टीम इंडियात कमबॅक करणार?