---Advertisement---

टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे झाले अनावरण, पहा फोटो

---Advertisement---

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 12 वी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या विश्वचषक विजयासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत अनेक क्रिकेटतज्ञांनी व्यक्त केले आहे.

त्यातच मागील विश्वचषकाप्रमाणेच यावेळीही भारतीय संघ विश्वचषकात नवीन जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. या नवीन वनडे जर्सीचे अनावरण आज(1 मार्च)झाले आहे. नाईक कंपनी याची मुख्य प्रायोजक असून हैद्राबादमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

ही जर्सी निळ्या रंगाच्या दोन छटांमध्ये आहे. तर नारंगी रंगाचाही वापर या जर्सीमध्ये करण्यात आला आहे. तसेच मागील जर्सीप्रमाणेच ही नवीन जर्सीही पुनर्नवीनीकरण पॉलिस्टरपासून(रिसायकल पॉलिस्टर) तयार करण्यात आली आहे.

तसेच या अनावरण प्रसंगी माजी कर्णधार एमएस धोनी, कर्णधार विराट कोहली, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, भारतीय टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, प्रतिभावान युवा क्रिकेटर पृथ्वी शाॅ आणि महिला संघातील प्रतिभावान युवा क्रिकेटर जेमिमा रोड्रीगेज उपस्थित होते.

या जर्सी अनावरणावेळी भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट म्हणाला, गेल्या दहावर्षातील मी घातलेली ही नाइकेची सर्वोत्तम जर्सी आहे.

बीसीसीआयने याआधीही 2015च्या विश्वचषकाआधी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले होते. यावेळीही विश्वचषकाच्या आधीच भारताच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे.

भारताने आत्तापर्यंत 1983 आणि 2011 ला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. यावर्षीच्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जूलैला होणार आहे.

तसेच भारतीय संघ उद्यापासून(2 मार्च) सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत याच नवीन जर्सीमध्ये दिसणार आहे.

https://twitter.com/Raj_Jiiva_MSD7/status/1101473675641942017

महत्त्वाच्या बातम्या-

नक्की भारतीय संघाच्या नव्या जर्सीवर लिहीलंय तरी काय?

संपुर्ण वेळापत्रक- अशी आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका

विराट कोहलीला द वाॅल राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी

काय सांगता ! हिटमॅन रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम मोडला

उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अशी आहे १५ जणांची टीम इंडिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment