भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आज (३० मे) भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची प्रतिष्ठित राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार २०२० साठी शिफारस केली आहे. याबरोबरच इशांत शर्मा आणि शिखर धवन या पुरुष खेळाडूंची तसेच महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू दीप्ती शर्माचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केले आहे.
भारत सरकारच्या युथ अफेअर्स आणि क्रीडा मंत्रालयाने १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीतील संबंधित पुरस्कारांसाठी आमंत्रणे मागविली होती.
रोहितने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने २०१९ हे वर्ष गाजवले होते. त्याचे २०१९ हे वर्ष वनडे क्रिकेटमधील आकडेवारीच्या दृष्टीने सर्वोत्कृष गेले होते. त्याने मागील वर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यात त्याने २८ सामने खेळताना ५७.३० च्या सरासरीने १४९० धावा केल्या आहेत. त्यात ६ अर्धशतके आणि ७ शतकांचा समावेश आहे. ही कामगिरी एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपेक्षा सर्वोच्च आहे.
टी२०त ४ शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज असून कसोटी सलामीवीर म्हणून तो कसोटी सामन्यात द्विशतके ठोकणारा पहिला खेळाडू आहे.
JUST IN : The BCCI nominates Mr @ImRo45 for the prestigious Rajiv Gandhi Khel Ratna Award 2020 while Mr @ImIshant, Mr @SDhawan25 and Ms @Deepti_Sharma06 have been nominated for Arjuna Awards.
More details here – https://t.co/s0n0LfvyfF pic.twitter.com/deDRBGVBRv
— BCCI (@BCCI) May 30, 2020
त्याने मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या वनडे विश्वचषकात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यादरम्यान त्याने ९ सामने खेळताना ८१ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या होत्या. त्यात त्याने सर्वाधिक ५ शतके ठोकली होती. या वर्षाच्या सुरुवातीला त्याला आयसीसीचा ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले होते.
शिखर धवनने (Shikhar Dhawan) पदार्पणातील सर्वात वेगवान कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग दोन सुवर्ण बॅट (सर्वाधिक धावांसाठी) जिंकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.