---Advertisement---

‘त्याला वेळोवेळी सपोर्ट केला तरीही…’, बीसीसीआय अधिकाऱ्याने काढली विराटची उणीधुणी

On: मंगळवार, सप्टेंबर 6, 2022 12:28 PM
Virat Kohli & Rohit Sharma
---Advertisement---

सध्या भारतीय क्रिकेटवर्तूळात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी निमित्त ठरले आहे ते विराट कोहलीचं वक्तव्य. मुळात विराट कोहलीला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता त्याने सल्लाकारांवर खास टीप्पणी केली. त्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकारांनी त्याच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली. अशांतच आता एका बीसीसीआय अधिकाऱ्याने उडी घेतली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एक वृत्तवाहिनीला सांगितले की,”‘विराटला सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. बीसीसीआयपासून त्यांच्या सहकारी खेळाडूंनी पाठिंबा दिला. पाठिंबा मिळाला नाही, हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याला गरज असताना ब्रेक देण्यात आला. जेव्हा त्याने कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनीही सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तो आता काय बोलतोय ते मला माहीत नाही. कोहली आणि बीसीसीआयमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांकडून त्याचा आदर केला जातो. तो तिन्ही फॉरमॅटमधील महान आणि महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा फॉर्म योग्य वेळी परत आला आहे. आमची इच्छा आहे की तो धावा करत राहो, ऑस्ट्रेलियात (टी-20 विश्वचषक) संघासाठी ते चांगले होईल.”

दरम्यान, भारताना पाकिस्तान विरुद्धचा सामना गमावल्यानंतर विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने अनेक विधाने केली. त्यावेळी त्याला येत असलेल्या सल्यांबाबत विचारले असता त्याने सांगितले की, “मला अनेकजण वैयक्तिकरित्या ओळखतात, अनेकांकडे माझा मोबाऊल क्रमांक आहे. पण मी जेव्हा कसोटी कर्णधारपद सोडले त्यावेळी एम एस धोनी वगळता कोणीही मला फोन किंवा मेसेज केला नाही. त्यामुळे अशा अप्रत्यक्ष सल्यांना मी महत्व हेत नाही.” यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपला विरोध दर्शवत विराट कोहलीवर निशाण साधला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुला कळत नाही का**!’ फोटोखाली चुकीची कमेंट करणाऱ्याला संजना गणेशनने झापलं

Breaking: सुरेश रैनाची आयपीएलमधून निवृत्ती, संपवले बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध!
सुपर-4 मध्ये श्रीलंकेशी भिडणार भारत, जाणून घ्या दुबईच्या हवामानाचा अंदाज आणि पिच रिपोर्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---