---Advertisement---

गांगुलींच्या विधानामुळे पुन्हा वाद! आता बंगाल क्रिकेट संघटना म्हणतेय…

On: शुक्रवार, फेब्रुवारी 4, 2022 9:58 PM
bcci-president-sourav-ganguly
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) अलिकडच्या काळात सतत विवादात राहिले आहेत. अशात एकदा पुन्हा गांगुली चर्चेचा विषय ठरले आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय आणि १६ फेब्रुवारीपासून टी२० मालिका खेळली जाणार आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धची टी२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळली जाणार आहे. अशात बंगाल क्रिकेट असोसीएशन (CAB) आणि बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांच्यातील ताळमेळ बिघडल्याचे दिसत आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाकारली गेली आहे. परंतु टी२० मालिकेविषयी मात्र चित्र अस्पष्ट झाले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममध्ये ७५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. परंतु, बीसीसीआय अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, बोर्ड खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या आरोग्याचा धोका पत्करू शकत नाही. याच कारणास्तव टी२० मालिकेत प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नसल्याचे गांगुलींनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---