भारताचा वेगवान गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) आयपीएलमध्ये दुखापत झाल्यानंतर बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. मयंक यादवचे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. अशातच त्याच्या भारतीय संघातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही मयंकला भारतीय क्रिकेट संघात संधी मिळू शकते की नाही? याबाबत वक्तव्य केले आहे.
गेल्या आयपीएल हंगामात मयंक यादवच्या वेगवान गोलंदाजीची बरीच चर्चा झाली होती. तो आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. त्याने आयपीएल 2024 मध्ये 4 सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएल 2024 मध्ये मयंक ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करताना दिसला होता. अनेकवेळा तो 156.7 किलोमीटर प्रतितास वेगाने चेंडू फेकतानाही दिसला होता. त्याच्या या वेगवान माऱ्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी चौथा वेगवान गोलंदाज शोधण्याची भारताची समस्या दूर होईल, असे मत माजी फलंदाज वसीम जाफरने मांडले होते. परंतु बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.
अलीकडेच वसीम जाफर म्हणाले होते, भारताचे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या वेगवान त्रिकूटाने तंदुरुस्त राहून कसोटी मालिकेत जास्तीत जास्त प्रदर्शन केले, तर भारताला ऑस्ट्रेलियात हॅट्ट्रिक करण्याची चांगली संधी आहे. याशिवाय मयंक यादव तंदुरुस्त राहिल्यास डार्क हॉर्स सिद्ध होऊ शकतो, असे मत जाफरने मांडले होते.
याबाबत जय शाह यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “मी तुम्हाला मयंद यादववर कोणतेही उत्तर देऊ शकत नाही. कारण तो संघात असेल की नाही याची शाश्वती नाही. पण तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. आणि आम्ही त्याची काळजी घेत आहोत. तो सध्या एनसीएमध्ये आहे.”
लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना युवा वेगवान गोलंदाज मयंकने सर्वांना प्रभावित केले. मात्र दुखापतीमुळे त्याला केवळ चार सामने खेळून स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मयंकला 2022 च्या लिलावात लखनऊ संघाने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते, पण नंतर दुखापतीमुळे त्याच्या जागी अर्पित गुलेरियाला स्थान देण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“महिला जिवंत असेपर्यंत तिला त्रास देण्यात…”, मोहम्मद शमीच्या एक्स पत्नीची कोलकाता प्रकरणावरील पोस्ट व्हायरल
आश्चर्यकारक…! वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टाॅप-5 गोलंदाजांमध्ये एकही नाही भारतीय
ज्युनियर वॉल! राहुल द्रविडच्या मुलाचा रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये गगनचुंबी षटकार – Video