आशियाई क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह हे २०२१ वर्षाच्या सुरुवातीपासून आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळत आहेत. आता त्यांच्या या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आणखी एका वर्षाने वाढवण्यात आला आहे.
आशियाई क्रिकेट कौन्सिलची (Asian Cricket Council) शनिवारी (१९ मार्च) कोलंबो येथे बैठक पार पडली. या बैठकीत आशियाई क्रिकेटचे सदस्य असलेल्या संघांचे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी एकमताने जय शाह (Jay Shah) यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता २०२४ पर्यंत जय शाह हेच आशियाई क्रिकेटच्या कार्यकारी मंडळासह आणि त्यांच्या समित्यांसह कार्यभार पाहतील.
जय शहा हे भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांचे सुपूत्र असून गेले काही वर्ष ते क्रिकेट प्रशासनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१९ सालापासून ते बीसीसीआयच्या सचिव पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
AGM Update: The ACC Members unanimously decided that the tenure of Mr. @JayShah as ACC President and that of the Executive Board along with its Committees will continue until the 2024 AGM @BCCI @TheRealPCB @BCBtigers @ACBofficials @ThakurArunS pic.twitter.com/ah8FKIQ7D4
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) March 19, 2022
श्रीलंकेत होणार आशिया चषक
आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या (ACC) बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. तसेच या बैठकीत आशिया चषक स्पर्धेबद्दलही (Asia Cup) महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यंदा श्रीलंकेमध्ये २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान टी२० स्वरुपात आशिया चषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी २० ऑगस्टपासून सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला विश्वचषक: भारताला नमवत ऑस्ट्रेलियाचा सलग ५वा विजय, मिताली अन् कंपनीचा सेमीफायनचा मार्ग कठीण
कूक अन् कोहलीला मागे सोडत रूटचा नाद खुळा विक्रम; थेट गाठले अव्वल स्थान