विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामाला (जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३) भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून सुरुवात करेल. भारत या दौऱ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर होणार आहे. मालिका सुरू होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना, भारतीय संघ मजामस्ती करताना दिसून आला. भारतीय खेळाडूंचा सराव सत्रातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय संघ करतोय मजामस्ती
कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने डरहॅम येथे दोन आठवडे सराव केला. त्यानंतर संघ ३० जुलै रोजी नॉटिंघम येथे पोहोचला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच हा संपूर्ण व्हिडिओ बीसीसीआयच्या वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय खेळाडू सरावादरम्यान मजामस्ती करताना दिसून आले. ‘मजा, सराव आणि हसू’ असे कॅप्शन दिलेल्या या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा हा भारतीय खेळाडू कसा वेगवेगळा सराव करतात हे सांगताना दिसतो.
या व्हिडिओमध्ये खेळाडूंना क्रिकेटचा चेंडू फुटबॉलप्रमाणे आपण मारताना पाहू शकतो. तसेच, रोहितने या सरावाचे नियम सांगितल्याचे व्हिडिओत दिसते. यात क्षेत्ररक्षणाचा सराव करताना एका खेळाडूने डोक्यावर हेल्मेट चढवायचे आणि प्रशिक्षकाने फेकलेला चेंडू हेल्मेटने उडवायचा, तो उडालेला चेंडू अन्य खेळाडूंनी झेलण्याचा प्रयत्न करायला, अशा प्रकारचा हा अनेख्या पद्धतीने भारतीय खेळाडू सराव करताना दिसत आहेत. तसेच हा सराव करताना खेळाडूंना हसूही रोखता आले नसल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे हा खेळ केवळ खेळाडूंनीच नाही, तर भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफ सदस्यांनीही खेळला. या व्हिडिओमध्ये कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ अत्यंत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
Fun 😎
Practice 👌
Laughter 😀DO NOT MISS as @ImRo45's unique game leaves #TeamIndia in splits 😆 – by @RajalArora
Watch the full video 🎥 ⬇️ #ENGvIND https://t.co/2wvMB2m2Q8 pic.twitter.com/BqHMZ9uvfg
— BCCI (@BCCI) August 2, 2021
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, अभिमन्यू ईस्वरन, पृथ्वी शॉ, केएल राहुल, वृद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर व उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: भावनिक क्षण! भारतीय हॉकीपटूंचा ग्रेट ब्रिटनवर ‘विक्रमी’ विजय अन् समालोचकाला कोसळलं रडू
‘हे’ ३ भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसाठी आहेत मोठे प्रतिस्पर्धी; टी२० विश्वचषकात घेऊ शकतात जागा
क्रिकेटविश्वातील ५ सर्वात वजनदार क्रिकेटपटू, एकाने संघाला बनवलंय विश्वविजेता