शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेला पहिला कसोटी सामना अतिशय रोमांचक घडीवर आला आहे. आज (९ फेब्रुवारी) या सामन्याचा शेवटचा दिवस. यादिवशी यजमान भारतीय संघाला ३८१ धावांचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून कामगिरी करायची आहे. अगोदरच संघाने सलामीवीर रोहित शर्माची महत्त्वपुर्ण विकेट गमावली आहे. अशात अखेरच्या दिवशी मैदानावर उतरण्यापुर्वी भारतीय खेळाडूंची आणि प्रशिक्षकांची अंतिम योजनेबाबत चर्चा झाली.
यावेळचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री संघातील खेळाडूंशी चर्चा करताना दिसत आहेत. कर्णधार विराट कोहलीदेखील खेळाडूंना सल्ला देताना दिसत आहे. ही अतिशय अटीतटीची परस्थिती असून सर्वांना आपले उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये चालू असावी असे भासत आहे.
https://twitter.com/BCCI/status/1358978587030822913?s=20
या सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने भारतासमोर तब्बल ४२० धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १ विकेट गमावून ३९ धावा केल्या असल्याने अखेरच्या दिवशी त्यांच्यासमोर उर्वरित ३८१ धावा करण्याचे आव्हान असणार आहे. तर इंग्लंडला विजयासाठी पाचव्या दिवशी ९ विकेट्सची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून रिषभ पंतने करू नये फलंदाजी शैलीत बदल, भारतीय दिग्गजाने सांगितले कारण
“पंतमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असती, तर भारताने ब्रिस्बेन कसोटी जिंकलीच नसती”





