कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून जगभरात टाळेबंदी लागू झाली. याचा मोठा फटका क्रिकेट विश्वालाही बसला होता. अशात प्रेक्षकांविना बंद स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र भारत आणि इंग्लंड संघात १३ फेब्रुवारी पासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बीसीसीआयने ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.
मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच भारतातील सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची अनुमती दिली गेली आहे. म्हणून जवळपास १५ हजार प्रेक्षकांनी गजबजलेला दुसरा सामना हा खूप खास ठरणार असून तितकाच भावनिक देखील असेल. या परिस्थितीला लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या सामन्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) अत्यंत भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.
शुक्रवारी बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर एका भावुक संदेशासह एक व्हिडीओ देखील पोस्ट केला. हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या स्वागतार्ह पोस्ट करण्यात आला असून त्यात स्टेडियमच्या रिक्त खुर्च्या दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “आम्ही भारतीय संघाच्या चाहत्यांना खूप मिस केले आहे. आता दुसऱ्या कसोटीद्वारे तुमचे स्वागत करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. पुन्हा एकदा स्टेडियममध्ये तुमचा आवाज ऐकण्यास आम्ही आतुर झालो आहोत.”
Dear #TeamIndia fans we've missed you and we are now all set to welcome back crowds to cricket for the second Test.
Can't wait to have you roaring at The Chepauk tomorrow 💙💙@Paytm #INDvENG pic.twitter.com/7q4S1hPXrB
— BCCI (@BCCI) February 12, 2021
भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी कसोटी १३ ते १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सामन्याची सकाळी ९ वाजता नाणेफेक होईल आणि बरोबर ९.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना २२७ धावांनी जिंकत इंग्लंडने अगोदरच मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता प्रेक्षकांच्या सहवासात दुसरा सामना किती प्रभावी ठरेल आणि कोणाच्या पारड्यात विजय जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर, अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना; पराभवाचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज
केवळ ब्रेंडन मॅक्यूलमचे नाव असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता मोहम्मद रिजवाननेही मिळवले स्थान