---Advertisement---

लाईट्स,कॅमेरा,ऍक्शन! श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या ‘यंगिस्तान’च्या फोटोशूटची पाहा खास झलक

On: गुरूवार, जुलै 15, 2021 1:24 AM
---Advertisement---

भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत दोन हात करायचे आहेत. या दौऱ्यातील सामन्यांना १८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंचे फोटोशूट झाले असून बीसीसीआयने या फोटोशूटची छोटी झलक एका व्हिडिओतून शेअर केली आहे.

युवा खेळाडूंचा संघात समावेश 
सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, देवदत्त पडीक्कल, के गाॅथम, चेतन सकरिया, वरुण चक्रवर्ती या ६ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी असणार आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवन सांभाळणार असून भूवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे.

तसेच या संघात निवड झालेल्या ६ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसला तरी या संघात ही अनुभवी खेळाडू देखील आहेत. ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव आहे. यात धवन, भूवनेश्वर व्यतिरिक्त युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, दीपक चाहर, राहुल चाहर, संजू सॅमसन अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.

फोटोशूटदरम्यान युवा खेळाडूंचा उत्साह 
या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली असल्याने भारताची जर्सी घालून केलेल्या फोटोशूटदरम्यान त्यांचा उत्साह दिसून येत आहे. तसेच या फोटोशूटदरम्या काही खेळाडू टेबलटेनिस खेळताना दिसत आहेत. तर काही खेळाडू व्हिडिओ गेम खेळताना दिसत आहेत.

या व्हिडिओला बीसीसीयआयने कॅप्शन दिले आहे की ‘जेव्हा भारतीय खेळाडू लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन प्रक्रियेला सामोरे जातात. श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी उत्साह वाढत आहे.’

असा आहे श्रीलंका दौरा 
या श्रीलंका दौऱ्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले जाणार आहे. खरंतर या दौऱ्याला १३ जुलै रोजी सुरुवात होणार होती. मात्र, यजमान श्रीलंकेच्या गोटात कोरोना व्हायरसची प्रकरणे आढळल्याने काही दिवस हा दौरा पुढे ढकलण्यात आला.

आता या दौऱ्याला बदललेल्या वेळात्रकानुसार १८ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. १८ जुलैनंतर २० आणि २३ जुलै रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर २५ जुलैपासून टी२० मालिकेला सुरुवात होईल. टी२० मालिकेतील सामने अनुक्रमे २५, २७ आणि २९ जुलै रोजी खेळले जातील. वनडे आणि टी२० मालिकेतील सर्व सामने कोलंबो येथेच होणार आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईतील फार्मर्स कॅफेबाहेर स्पॉट झाला मास्टर ब्लास्टरचा मुलगा; पॅपराजींनी टिपले फोटो

ऐकलंत का! श्रीलंकन प्रशिक्षकाचे टीम इंडियाबाबत मोठे वक्तव्य; म्हणतायत, ‘भारत आपल्या सर्वोत्तम आयपीएल…’

“हार्दिकला भारताचा कर्णधार न केल्याचे वाईट वाटले, तो चांगला पर्याय ठरला असता”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---