---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयच्या ऑफिसला लागले टाळे

On: सोमवार, मार्च 16, 2020 7:52 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय मुंबई शहरात आहे. हे मुख्यालय उद्या अर्थात मंगळवारपासून बंद असणार आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे सरकारी तसेच खाजगी कार्यालयांत सध्या शुकशुकाट आहे. खाजगी कंपन्यातील अनेक कर्मचारी सध्या घरुनच काम करत आहे.

आता याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने देखील हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बीसीसीआयचे सर्व कर्मचारी घरुनच काम करणार आहेत.

उद्या आयपीएल संदर्भात होणारी बीसीसीआयची बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेसोबत सुरु असलेली मालिका कोरोनाच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. तसेच आयपीएलदेखील 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

बीसीसीआयचे मुख्यालय हे वानखेडे स्टेडियमवर आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-गोष्ट एका क्रिकेटरची: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

-कोरोना व्हायरसमुळे सचिनचे विक्रम तोडण्याच्या विराटच्या मिशनला खिळ?

-टाॅप ५: मांजरेकरांसह इतिहासात हाकालपट्टी झालेले ५ समालोचक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---