भारतीय खेळाडूंच्या विदेशातील टी20 लीगमधील सहभागाबाबत नेहमीच अनेक प्रश्न विचारले जातात. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना कोणत्याही इतर लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली जात नाही. या लीगमध्ये खेळायचे असल्यास भारतीय खेळाडूंना थेट निवृत्ती घ्यावी लागते. आता या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआय एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सध्या भारतीय खेळाडूंना जगातील कोणतीही लीग खेळण्याची परवानगी नाही. विदेशी लीग खेळायचे असल्यास भारतीय खेळाडूंना सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटपासून दूर व्हावे लागते. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व आयपीएल क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतरच हे खेळाडू बाहेर देशात खेळण्यासाठी पात्र होत असतात. मागील दोन वर्षातील काळात अनेक युवा क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अमेरिकेसाठी खेळण्यास सुरुवात केली. तसेच काही आंतरराष्ट्रीय भारतीय खेळाडूंनी देखील अकाली निवृत्ती घेत इतर लीग खेळण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जातात. भारतीय खेळाडू निवृत्तीनंतर लगेच इतर लीगमध्ये खेळू नये यासाठी बीसीसीआय कूलिंग पिरीयड सुरू करू शकते. यामध्ये निवृत्त झाल्यानंतर खेळाडू एका विशिष्ट कालावधीनंतरच या लीगमध्ये सहभागी होऊ शकतात. मुंबई येथे झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सभेत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी व सचिव जय शहा हे घेतील.
या सर्व चर्चा सुरू असतानाच आता नुकताच आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने आगामी मेजर लीग क्रिकेट या अमेरिकेतील स्पर्धेतून माघार घेतली आहे.
(BCCI Thinking About Cooling Period For Retired Players Due To Foreign League)
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा बर्थडे सेलिब्रेशनचा ‘माही वे’! आपल्या लाडक्या श्वानांसह साजरा केला वाढदिवस, पाहा क्युट व्हिडिओ
विश्वचषकापूर्वी OYO कंपनीने उचलले मोठे पाऊल, 10 शहरांमध्ये वाढवणार तब्बल ‘एवढे’ हॉटेल्स