---Advertisement---

आतुरता! रोहितला ऑस्ट्रेलियाला रवाना करण्याबाबत बीसीसीआय आज घेणार निर्णय?

On: शुक्रवार, डिसेंबर 11, 2020 12:17 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच मर्यादित षटकांची मालिका पार पडली. भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा या मालिकेचा भाग नव्हता. दुखापतीमुळे मर्यादित षटकाच्या मालिकेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली नव्हती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड होऊनही रोहित अद्याप ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नाही. रोहित कसोटी सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही, हे शुक्रवारी (11 डिसेंबर) स्पष्ट होईल.

बीसीसीआय रोहितला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता
वास्तविक, रोहित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) तंदुरुस्तीवर काम करत आहे. रोहितच्या तंदुरुस्तीबाबतचा अहवाल एनसीए आज (11 डिसेंबर) बीसीसीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे. अहवालात रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आढळल्यास त्याला ऑस्ट्रेलियाला रवाना करण्याविषयीचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागेल.

रोहित उर्वरित भारतीय खेळाडूंमध्ये होणार सामील?
रोहितला उर्वरित भारतीय खेळाडूंमध्ये सामील करायचं की नाही, हे बीसीसीआयसमोर मोठे आव्हान असेल. वास्तविक,  कोरोना या साथीच्या आजारामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये बायो बबलमध्ये स्थान देण्यात आले आहे. म्हणजेच संघातील खेळाडू वेगळे राहतात. तसेच, त्यांना त्यांच्या ग्रूपमधून बाहेर कुठेही जाण्याची परवानगी नाही.

तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतो रोहित
ऑस्ट्रेलियन सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, दुसऱ्या देशातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागते. अशा परिस्थितीत जर रोहित 12 ते 13 डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाला रवाना झाला, तर त्याला किमान 26 डिसेंबरपर्यंत क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. त्यामुळे त्याला दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागेल. 7 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकतो. मात्र, त्याच्या तंदुरुस्तीवरही हे अवलंबून असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ! दुसऱ्या सराव सामन्यातून मोझेस हेन्रीक्स बाहेर; ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत

“ड्रिंकदरम्यान शास्त्रींनी सांगितले, ‘हा’ असेल टीम इंडियाचा तिसरा वेगवान गोलंदाज”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा खुलासा

ट्रेंडिंग लेख-

शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास

शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ

अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---