नुकतेच भारताला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 स्पर्धेत रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. त्यानंतर पुन्हा एकदा त्या चर्चेला उधान आले ती म्हणजे भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण तर एमएस धोनी. जेव्हाही भारताच्या कर्णधाराबाबत बोलले जाते तेव्हा-तेव्हा धोनीचेच नाव पुढे येते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007मध्ये टी20 विश्वचषक, 2011मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी यांचे विजेतेपद पटकावले. मात्र तेव्हापासून धोनीने कर्णधारपद सोडले तेव्हापासून भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.
भारताला आठव्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने दारूण पराभव स्विकारावा लागला. अशी स्थिती असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एमएस धोनी (MS Dhoni) याच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
धोनीला क्रिकेटचे किती ज्ञान आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्याचे निर्णयही मैदानावर अनेकदा अचूक ठरलेले आहे. मग ते भारतासाठी असो वा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जसाठी. त्याच्या या निर्णयक्षमतेमुळे आणि अनुभवामुळे बीसीसीआयने त्याची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे, विशेषकरून 2024च्या टी20 विश्वचषकासाठी.
रिपोर्ट्सनुसार, धोनी पुढील वर्षी शेवटचा आयपीएल हंंगाम खेळणार असल्याने बीसीसीआयने त्याला 2024च्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील करण्याचा विचार केला आहे. यावेळी तो कोणती जबाबदारी पार पाडणार, हे निश्चित नाही.
मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात (2021) धोनी भारतीय संघाचा मेंटर म्हणून संघात दाखल झाला होता. तो केवळ त्या स्पर्धेपुरताच मर्यादित होता, मात्र त्याही स्पर्धेत भारताच्या हाती निराशाच लागली. आता बीसीसीआयने पुन्हा एकदा त्याची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून यावेळी तो मोठ्या काळासाठी संघासोबत असण्याची शक्यता आहे.
काहींनी तर भारताच्या संघव्यवस्थापनेत दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स (AB de Villiers) याचा समावेश करण्याचा सल्ला दिला होता, मात्र अदयापही याबाबत कोणतेही अधिकृत विधान बोर्डकडून आलेले नाही.
भारत टी20 विश्वचषकानंतर विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा यांच्याशिवाय न्यूझीलंडला रवाना झाला. या दौऱ्यात तीन-तीन सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारताचा टी20 संघ खेळणार असून पहिला सामना 18 नोव्हेबंरला खेळला जाईल.तसेच वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवन याच्याकडे सोपवण्यात आले आहे.BCCI’s big decision regarding India’s T20 team, wanted to use MS Dhoni Experience ahead of 2024 world cup
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने सानिया मिर्झाला दिल्या वाढदिवसाच्या ‘हटके’ शुभेच्छा, पाहाच एकदा
IPL 2023: केकेआरला दुसरा झटका, बिलिंग्जनंतर कर्णधारानेही ट्विट करत पुढच्या हंगामात खेळण्यास दिला नकार