भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. जे की 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी दोन्ही संघ मेहनत घेताना दिसत आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली असून, या घोषणेपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची जोरदार चर्चा होती. शमी तंदुरुस्त होईल आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग असेल असे मानले जात होते. पण जेव्हा संघ जाहीर झाला तेव्हा त्याचे नाव त्यात नव्हते. आता कर्णधार रोहित शर्माने शमीबद्दल महत्त्वाची माहिती दिली असून ऑस्ट्रेलिया मालिकेत या वेगवान गोलंदाजाच्या उपलब्धतेबाबतही मोठी अपडेट सांगितली आहे.
अलीकडेच अशा बातम्या आल्या की, मोहम्मद शमी बरा होत असताना त्याला पुन्हा दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाला उशीर होऊ शकतो आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याचे निवड होणे कठीण आहे. यानंतर शमीने सोशल मीडियावर अशा बातम्या देणाऱ्यांना फटकारले होते. मात्र, आता त्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येत आहे. कारण कर्णधार रोहित शर्मानेही शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट केले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी मंगळवारी पत्रकार परिषदेला आलेल्या रोहित शर्मालाही मोहम्मद शमीबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना भारतीय कर्णधार म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निर्णय घेणे कठीण आहे. त्याच्या गुडघ्याला सूज आली होती आणि त्यामुळेच तो पुन्हा एकदा रिकव्हरीला सुरुवात करेल. आम्हाला अनफिट शमीला ऑस्ट्रेलियात घेऊन जायचे नाही. आशा आहे. तो 100 टक्के परत येण्याच्या प्रक्रियेत होता, त्याच्या गुडघ्यात थोडी सूज आली होती, त्यामुळे त्याला पुन्हा डॉक्टरांसोबत काम करायला लागलं होतं.
हेही वाचा-
IND VS NZ; कसोटीच्या रणसंग्रमाला उद्यापासून सुरुवात, हाॅटस्टार नाही तर या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना
न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान जाणूनबुजून हरला? 1-2 नव्हे तर चक्क इतक्या कॅच सोडल्या
IND vs NZ: पहिल्याच कसोटी सामन्यावर पावसाचं सावट! पाहा हवामान अंदाज