सध्याच्या युगात कोणतीही गोष्ट अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण जगात व्हायरल होऊ शकते. नेटकऱ्यांना बसल्या जागी जगभरात काय सुरू आहे, हे एका क्लीकवर समजते. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. क्रीडाक्षेत्रातील देखील अनेक गोष्टी व्हायरल होतात. आता क्रिकेटच्या मैदानातील असाच एक व्हिडिओ सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.
क्रिकेटच्या मैदानात यापूर्वी अनेकदा फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची बॅट तुटल्याचे पाहिले गेले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत देखील फलंदाजाची बॅट तुडल्याचे दिसते. परंतु व्हिडिओत विशेष बाब ही आहे की, फलंदाजाची बॅट चेंडूशी कसलाही संपर्क आला नसताना तुटते. यापूर्वी जेव्हा कधी फलंदाजाची बॅट तुटली असेल, तेव्हा त्याचे कारण प्रामुख्याने वेगवान गोलंदाजी राहिले आहे. पण ही कदाचित पहिलीच वेळ असावे, जेव्हा चाहत्यांना लाईव्ह सामन्यात असे काही पाहायला मिळाले असेल. व्हिडिओ व्हायरल होण्याचे देखील हेच कारण असू शकते.
https://www.instagram.com/reel/CgY2Qb2jief/?utm_source=ig_web_copy_link
व्हिडिओवर चाहत्यांकडून मोठ्या प्रामाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. अनेकांच्या मजेशीर प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, ही बॅट चीनमधून मागवली असावी, ज्यामुळे चेंडू लागण्यापूर्वीच तुटली. एका चाहत्याने कमेंट केली की, “मी असे कधीच पाहिले नाहीये, यष्टीरक्षक आणि फलंदाज दोघेही यामुळे हैराण आहेत.”
एका चाहत्याने ब्रेकिंग न्यूजप्रमाणे हेडिंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने कमेंटमध्ये लिहिले की, “बॅटने नुकतीच केली आहे आत्महत्या.” अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “संघाचे बजेट कमी आहे.” अशाच प्रकारच्या इतरही अनेक कमेंट्स व्हिडिओच्या खाली पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, फलंदाज चेंडू मारणातच होता, पण त्यापूर्वीच बॅट तुटून खेळपट्टीवर पडली. यष्टीपाठी उभा असलेला यष्टीरक्षक, फलंदाज आणि स्लीप्समध्ये उभा असलेला खेळाडू हे तिघेही या प्रसंगानंतर हैराण झाले होते. तसेच गोलंदाजही चेंडू टाकल्यानंतर जागेवर उभा राहून बॅटकडे पाहत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘तो क्रिकेट खेळायचा तेव्हा तू चड्डीत होता’, सचिनचा अपमान? करणाऱ्या क्रिकेटपटूवर टीका
‘त्या अश्विनला बाहेरच बसवा’…भारताच्या दिग्गज यष्टीरक्षकाचा सल्ला