कालपासून(१६ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना मँचेस्टर येथे सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाकडून अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आणि सलामीवीर फलंदाज डॉमनिक सिब्ले यांनी शतके झळकावली आहेत. याबरोबरच बेन स्टोक्सने एक खास विक्रमही केला आहे.
स्टोक्सने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा या सामन्यादरम्यान पार केला आहे. ही कामगिरी त्याने १४१ व्या प्रथम श्रेणी सामन्यात केली आहे. तसेच त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३२५ विकेट्सही आहेत. त्यामुळे तो १९७४ नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८००० धावा आणि ३०० विकेट्सचा टप्पा सर्वात जलद पार करणारा अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे.
एवढेच नाही तर इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासात स्टोक्स प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८००० धावा आणि ३०० विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर डब्ल्यू जी ग्रेस आहेत. त्यांनी १९६५ ते १९०८ या दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे. त्यांनी हा विक्रम केवळ ९७ प्रथम श्रेणी सामन्यात केला होता.
सध्या मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २७० धावांचा टप्पा पार केला आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात ८००० धावा आणि ३०० विकेट्सचा टप्पा पार करणारे इंग्लंडचे क्रिकेटपटू –
९७ सामने – डब्ल्यूजी ग्रेस
१४१ सामने – बेन स्टोक्स
१५० सामने – जेआर मेसन
१५८ सामने – जेडब्ल्यू हिअर्ने
१६० सामने – आरसी इराणी
ट्रेंडिंग घडामोडी –
कोरोनाच्या भितीच्या वातावरणात आणखी एक धक्कायदाय वृत्त, बंगाल क्रिकेटमध्ये…
असा व्यक्ती, ज्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड रातोरात मालामाल झाले
जरी धोनी- कोहली चेस मास्टर असले तरीही ‘हा’ विक्रम मात्र दुसऱ्याच खेळाडूच्या नावावर