---Advertisement---

बेन स्टोक्सच्या वडिलांचे ब्रेन कॅन्सरने निधन

On: मंगळवार, डिसेंबर 8, 2020 8:40 PM
---Advertisement---

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या वडिलांचे निधन झाले आहे. स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कॅन्सर झाला होता. गेली काही वर्षे ते या आजाराशी झुंज देत होते.
न्यूझीलंडमध्ये जन्मलेले बेन स्टोक्सचे वडील गेड स्टोक्स रग्बी खेळाडू होते. त्यांनी काही काळ प्रशिक्षक म्हणून देखील काम केले होते. मध्यंतरी ते बेन स्टोक्ससह इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते. मात्र शेवटच्या काही काळात ते मायदेशी न्यूझीलंडला वास्तव्यास गेले होते.

बेन स्टोक्स आयपीएल खेळण्यापूर्वी आपल्या वडिलांच्या आजारपणामुळे त्यांच्यासह न्यूझीलंडमध्येच होता. आयपीएलसाठी दुबईत वडिलांनीच मला पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी प्रवृत्त केल्याचे स्टोक्सने सांगितले होते. आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात जेव्हा स्टोक्सने शतक झळकाविले होते, तेव्हा त्याने आपले शतक वडिलांनाच समर्पित केले होते.

स्टोक्सच्या वडिलांची प्रेरणादायी कहाणी
बेन स्टोक्सचे वडिल गेड स्टोक्स यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. गेड स्टोक्स हे एक रग्बी खेळाडू होते. खेळताना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना खेळापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी हार न मानता दुखापत झालेलं संपूर्ण बोटच कापून घेतले होते आणि आपली कारकीर्द पूर्ण केली होती. याच कारणामुळे बेन स्टोक्स शतक झळकाविल्यावर आनंद व्यक्त करताना एका हाताचे बोट मोडून वडिलांना अभिवादन करत असतो.P

महत्वाच्या बातम्या:
–  ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित
 INDvsAUS: स्वेप्सनने वाचवला ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप; तिसऱ्या टी२० सामन्यात भारत १२ धावांनी पराभूत
 टीम इंडियासाठी आनंदाची गोष्ट; अजिंक्य रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या या संघाविरुद्ध शतकी खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---