इंग्लंडचा प्रमुख अष्टपैलू व कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आपल्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना खेळण्यासाठी डरहॅम येथील क्रिकेट मैदानावर उतरला. अखेरच्या वेळी वनडे सामन्यात उतरताना तो खूपच भावूक झाला. स्टोक्स मैदानात उतरत असताना रडताना दिसला. त्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
स्टोक्सने सोमवारी (१८ जुलै) वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. स्टोक्स म्हणालेला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळल्यानंतर तो पुन्हा कधीही ५० षटकांचे क्रिकेट खेळणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात जेव्हा इंग्लंडचा संघ मैदानात उतरू लागला तेव्हा स्टोक्सच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो आपले अश्रू अश्रू पुसताना दिसला. इंग्लंड क्रिकेटने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने त्याला या अखेरचा सामन्यात सर्वप्रथम मैदानात येण्याची संधी दिली.
❤️
🏴 #ENGvSA 🇿🇦 | @benstokes38 pic.twitter.com/teNgTVlV7T
— England Cricket (@englandcricket) July 19, 2022
भारताविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत बेन स्टोक्सची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. स्टोक्सने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ०, २१ आणि २७ धावा केलेल्या. वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बेन स्टोक्सला आता पूर्ण लक्ष कसोटी आणि टी२० क्रिकेटवर द्यायचे आहे. स्टोक्सची वनडे कारकीर्द लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध २०१९ च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील त्याच्या मॅचविनिंग कामगिरीसाठी लक्षात राहील. स्टोक्सच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर इंग्लंडचा संघ वनडे विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला.
या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना आपल्या ५ षटकात ४४ धावा दिल्या. मात्र, त्याला एकही बळी घेण्यात यश आले नाही. तसेच, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता तो केवळ ५ धावा काढून बाद झाला. त्याला फिरकीपटू एडेन मार्करमने पायचित केले. अशाप्रकारे त्याने आपल्या १०५ सामन्यांच्या वनडे कारकिर्दीत त्याने २९२४ धावा केल्या. तसेच त्याच्या नावे ७४ बळींची नोंद झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”
बेन स्टोक्सच्या निवृत्तीसाठी माजी इंग्लिश कर्णधाराने आयसीसीला धरले जबाबदार, वाचा काय म्हणाला
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला