---Advertisement---

“विराट कोहलीने धावा करायला नको, कारण…”, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचे भाष्य

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. आज (२६ मार्च ) या मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लिश खेळाडूने कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

या मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. अशातच दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यापूर्वी गुरुवारी (२५ मार्च) झालेल्या मुलाखतीत, बेन स्टोक्सने विराट कोहलीबद्दल बोलताना म्हटले की, “माझे वैयक्तिक मत आहे की, विराट कोहलीने धावा करायला नको. कारण आमच्यासाठी ते चांगले नाही.”

तसेच जेव्हा स्टोक्सला विराटच्या स्वभावाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तो म्हणाला, “प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू मैदानावर एक विशिष्ट प्रकारची वृत्ती स्वीकारतो, जेणेकरुन त्यांना यश मिळेल. गेल्या चार-पाच वर्षांत ही पद्धत आमच्यासाठी अनुकूल नाही. आम्ही त्याच गोष्टीवर ठाम असतो, जे आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि ज्यामुळे आमचा संघ एक चांगला संघ बनतो. प्रत्येक संघाची एक वेगळी पद्धत असते. भारतीय संघाची वेगळी आहे तर आमची देखील वेगळी आहे.”

जो रूटला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, “मला खरं तर तिसऱ्या क्रमांकावर, रुटची मानसिकता समजून घ्यायची होती. त्याचे (रूटचे) स्पष्ट म्हणणे होते की, तू जसा खेळतो तसाच खेळत रहा. रुटची खेळण्याची शैली वेगळी आहे आणि माझी शैली वेगळी आहे. याचा अर्थ हा नाही की मी देखील त्याच्यासारखे खेळायला हवे. तिसऱ्या क्रमांकावर मला १०० चेंडू खेळायला मिळू शकतात. मी जास्त फरक पडेल यावर लक्ष केंद्रित करत नाही. मला फक्त डावाची सुरुवात करताना वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.”

महत्त्वाच्या बातम्या –

INDvENG: दुसऱ्या वनडेत इंग्लंडने जिंकली नाणेफेक; पाहा कुणाला मिळाली जखमी श्रेयस अय्यरच्या जागी संधी

दुसऱ्या वनडेत शिखर धवन करु शकतो ‘हा’ मोठा रेकॉर्ड; गांगुली, विलियम्सनलाही टाकू शकतो मागे

‘रनमशीन’ विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी; सचिन, पाँटिंगच्या विश्वविक्रमांची करु शकतो बरोबरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---