लोकसभा निवडणूक 2024 साठी रविवारी (10 मार्च) तृणमूल काँग्रेसने 42 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात भारतीय संघाजा माजी क्रिकेटपटू युसूफ पढाण याचेही नाव आहे. तृणमूल काँग्रेसने बहारमपूर लोकसभात मतदारसंघातून युसूफला उमेदवारी दिली आहे. युसूफला चांगल्या राजकीय कारकिर्दीसाठी त्याचा भाऊ इरफान पठाण (Irfan Pathan) याच्याकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसने युसूफ पठाण (Yusuf Pathan) याच्यासोबतच भारतीय क्रिकेट संघाच्या अजून एका खेळाडूला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचेही नाव 42 लोकसबा उमेदवारांच्या यादीत आहे. आझात बर्धमान दुर्गापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवतील. युसूफ मैदानात आपल्या मोठमोठ्या षटकारांसाठी ओळखला जायचा. पण खूप कमी चाहत्यांनी भविष्यात त्याला राजकीय नेत्याच्या रुपात पाहण्याचा विचार केला असेल. असे असले तरी, युसूफने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
इरफान आणि युसूफ अनेकदा भारतीय संघासाठी एकत्र खेळले आहेत. दोघा भावांची ही जोडी अनेकदा विरोधी संघासाठी सर्वात मोठा अडथळा देखील ठरली आहे. आता आपला मोठा भाऊ लोकसभा निवडणूक लढवणार म्हटल्यावर इरफानने त्याला शुभेच्छा दिल्या. इरफानच्या शुभेच्छा वाचून युसूफला देखील स्वतःवरील आत्मविश्वास वाढू शकतो. इरफानने या पोस्टमध्ये लिहिले की, “तुझे धैर्य, दयाळूपणा, गरजूंना मदत करणे आणि कोणतेही अधिकृत वद नसतानाही इतरांची सेवा करण्याचा स्वभाव पाहिला गेला आहे. मला विश्वास आहे की, एकदा तू राजकीय भूमिकेत पाऊल टाकले, तर लोकांचे दैनंदिन आयुष्य बदलून टाकू शकतोस.”
View this post on Instagram
युसूफ पठाणची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द
युसूफच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 2007 मध्ये पहिला सामना आणि 2012 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला. 41 वर्षीय युसूफने भारतासाठी 57 वनडे आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 27च्या सरासरीने 810 धावा केल्या आहेत. तसेच 146.58च्या स्ट्राईक रेटने 236 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये 123ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. गोलंदाजाच्या रुपात त्याने वनडे क्रिकेटमध्ये 5.5च्या इकॉनॉमी रेटने 33 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8.62 च्या इकॉनॉमीने 13 विकेट्स घेतल्या आहेत.
युसूफ पठाणची आयपीएल कारकीर्द –
इंडियन प्रीमियर लीगमध्ये युसूफने आपली वेगळी छाप सोडली आहे. त्याने 174 आयपीएल सामन्यांमध्ये 3204 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतके होती. आयपीएलमध्ये गोलंदाजाच्या रुपात त्याने 42 विकेट्स देखील नावावर केल्या. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 7.4 होता. आयपीएलमध्ये गोलंदाज म्हणून त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन 20 धावा खर्च करून तीन विकेट्स, असे होते. (Best wishes from Irfan Pathan to Yusuf Pathan for 2024 Lok Sabha Elections)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आयपीएल खेळण्यासाठी पंतला ग्रीन सिग्नल?
“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ