भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, यष्टीरक्षक वृद्धीमान साहा आणि राखीव फलंदाज अभिमन्यु ईस्वरन शनिवारी (२४ जुलै) डरहॅम येथे भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला. लंडनमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तिघेही भारतीय संघात सामील झाले. हे तिघेही थ्रोडाउन तज्ज्ञ दयानंद गिरानी यांच्या संपर्कात आले होते. दयानंद १४ जुलै रोजी कोविड पॉझिटिव्ह आले होते. यूकेच्या कोविड प्रोटोकॉलनुसार या सर्वांना १० दिवस विलगीकरणात घालवावे लागले. मात्र, दयानंद गिरानी यांच्याविषयी काहीही माहिती मिळालेली नाही.
बीसीसीआयने ट्विटरद्वारे दिली माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून ट्विट करत लिहिले की, ‘तुम्हाला पुन्हा संघासह पाहून आनंद झाला. गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, वृद्धीमान साहा आणि अभिमन्यु इस्वरन हे डरहॅम येथे संघात सामील झाले आहेत.’
Great to have you back gents 😊#TeamIndia bowling coach B.Arun, @Wriddhipops and Abhimanyu Easwaran have joined the team in Durham. pic.twitter.com/VdXFE4aoK0
— BCCI (@BCCI) July 24, 2021
तत्पूर्वी, कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर पूर्णपणे बरा होऊन संघाचा प्रमुख यष्टीरक्षक रिषभ पंतचे संघात सामील झाल्याबद्दल स्वागत करण्यात आले होते. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याचे संघात शानदार स्वागत केले होते. इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघात कोविड पॉझिटिव्ह आढळणारा पंत हा पहिला खेळाडू होता. या कारणास्तव, त्याला सिलेक्ट काउंटी इलेव्हन विरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळता आला नाही. पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुलने यष्टीरक्षकाची भूमिका बजावली होती. तसेच शतकही ठोकले होते.
भारतीय खेळाडूंना जखडले आहे दुखापतींनी
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला सध्या दुखापतींनी ग्रासले आहे. युवा सलामीवीर शुबमन गिल, वेगवान गोलंदाज आवेश खान व अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त होऊन दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. तर, संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला देखील हॅमस्ट्रिंगचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणास्तव भारतीय संघाने सध्या श्रीलंकेत असलेल्या पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव व देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाचारण केले असल्याचे सांगितले जातेय.
महत्त्वाच्या बातम्या-
लंकादहन केल्यानंतर ३ भारतीय क्रिकेटर धरणार इंग्लंडची वाट, ‘अशी’ राहिलीय त्यांची प्रथम श्रेणी कामगिरी
पहिल्या टी२०त मैदानात उतरताच शिखरच्या नावे जमा होणार नकोसा विक्रम, रोहित पडेल मागे
किवीचा ‘हा’ फलंदाज आहे ‘कोहली भक्त’, विराटची बॅट घेऊन उतरला मैदानात