भारतामध्ये सध्या दलीप ट्रॉफी 2025 खेळवली जात आहे. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंसह तरुण खेळाडू देखील सहभागी झाले आहेत. 28 सप्टेंबरपासून स्पर्धेचे उपांत्यपूर्व सामने 4 संघांमध्ये सुरू झाले आहेत. नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन विरुद्ध नॉर्थ ईस्ट झोन अशी सामने रंगत आहेत. आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले गेले नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयवर जोरदार टीका केली होती. या प्रकरणात बीसीसीआयला चांगलंच ट्रोल व्हावे लागले होते. मात्र आता चाहत्यांची मागणी लक्षात घेऊन बीसीसीआयने दलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थेट प्रक्षेपण करण्याची घोषणा केली आहे. ही क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे. अंतिम सामना 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान बेंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. आम्ही आमच्या प्रसारकाशी 100 दिवसांच्या घरगुती क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणासाठी करार केला आहे, म्हणजेच आमच्या सर्व घरगुती स्पर्धांचे सामने थेट दाखवले जातील. बीसीसीआय घरगुती क्रिकेटला महत्त्व देते. त्यामुळेच तुम्ही पाहाल की जवळपास सर्व भारतीय खेळाडू हे सामने खेळताना दिसत आहेत.




