विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी खूप चांगली होती आणि त्यांनी अनेक संघांना पराभूत केले. अफगाणिस्तानच्या या कामगिरीबाबत संघाचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने मोठे वक्तव्य केले आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने ज्या प्रकारे कामगिरी केली त्यामुळे संपूर्ण जगाला एक चांगला संदेश गेला आहे, असे त्याचे म्हणने आहे.
या विश्वचषकात अफगाणिस्तानची कामगिरी चांगलीच झाली. त्यांनी 9 पैकी 4 सामने जिंकले आणि 5 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तान संघाने आणखी एक सामना निश्चितपणे जिंकला असता, तर ते उपांत्य फेरी गाठण्याचे प्रबळ दावेदार ठरले असते. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाच्या मार्गावर होते, पण ते सामना जिंकू शकले नाहीत.
हशमतुल्ला शाहिदी (Hashmatullah Shahidi) आपल्या संघाच्या कामगिरीवर खूप खूश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामन्यानंतर तो म्हणाला, “या स्पर्धेत आमच्या उत्कृष्ट कामगिरीने आम्ही संपूर्ण जगाला एक चांगला संदेश दिला आहे. आम्ही शेवटपर्यंत मोठ्या संघांशी स्पर्धा केली. निकाल आमच्या बाजूने लागला नाही पण आम्ही शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही आम्ही शेवटपर्यंत झुंज दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना हारणे आमच्यासाठी धक्कादायक होते. दुसर्या दिवशीही आमच्या पराभवाने आम्हाला खूप आश्चर्य वाटले. तरीही मला माझ्या संघाचा अभिमान आहे.”
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 च्या 42 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला आणि 9 सामन्यांत 7 विजय मिळवून लीग स्टेजचा शेवट केला. अफगाणिस्तानने प्रथम खेळताना निर्धारित 50 षटकांत 244 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 47.3 षटकांत 5 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला ओमरझाईने 97 धावांची उत्कृष्ट नाबाद खेळी खेळली. (Big reaction from Afghanistan captain Said In this World Cup we lived)
म्हत्वाच्या बातम्या
सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका देणार ऑस्ट्रेलियाला मात! दिग्गजाचे महत्वपूर्ण विधान
अनुष्काने विचारलं 150 च्या स्पीडचा बाउन्सर की यॉर्कर, कशाची भीती वाटते? ,पाहा विराटने काय दिलं उत्तर