जगभरातील दिग्गज कर्णधारांमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू एमएस धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्यात 2007चा टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. धोनीचा चाहतावर्ग जगभरात आहे. चाहते नेहमीच त्याला भेटण्यासाठी आतुर असतात. अलीकडेच बिग बॉस 16चा विजेता एमसी स्टॅन याने धोनीची भेट घेतली. आता एमएस धोनी आणि एमसी स्टॅन यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
खरं तर, एमसी स्टॅन (MC Stan) हा त्याच्या रॅप गाण्यांसाठी खूपच लोकप्रिय आहे. त्याची लोकप्रियता खूपच जास्त आहे. त्याने आपल्या चाहत्यांच्या जोरावर बिग बॉस 16 हंगामाचं विजेतेपद जिंकलं होतं. अशात त्याला भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला भेटण्याची संधी मिळाली.
सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असलेल्या फोटोत धोनीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. तसेच, स्टॅन त्याच्या अंदाजात पोझ देताना दिसत आहे. यादरम्यान एक व्यक्ती या दोघांमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही पोस्टवरून नेटकरी भडकल्याचेही दिसते.
एकाने लिहिले की, “धोनीच्या कारकीर्दीतील सर्वात नीचांक.”
Lowest point in Dhoni's career 😤😤☹️
— Avinash (@avieeee__) October 17, 2023
दुसऱ्या एकाने ट्वीट केले की, “धोनीने त्याच्या आयुष्यात घेतलेला सर्वाच खराब निर्णय.”
Only bad decision taken by MS Dhoni in his life 🤔 pic.twitter.com/miREVTTtiv
— MORE THAN YOU'LL EVER KNOW (@JagoIndia_) October 17, 2023
आणखी एकाने लिहिले की, “हात जोडून विनंती करतो, धोनीपासून दूर राहा.”
Hath jod ke guzarish karte hai door raho Dhoni se😡
— जौली ♡☾ (@blackbindigirl) October 17, 2023
दुसरीकडे, धोनीविषयी बोलायचं झालं, तर तो अखेरचा आयपीएल 2023 स्पर्धेत खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याने गुडघ्याची सर्जरीही केली होती. तसेच, तो आपल्या रिहॅबमध्ये व्यस्त होता. सध्या तो वेगवेगळ्या जाहिराती करताना दिसत आहे. अशात चाहत्यांना वाटतंय की, धोनी आणि स्टॅनची भेटही कोणत्या तरी शूटदरम्यानच झाली असेल.
विशेष म्हणजे, धोनी आयपीएल 2023 स्पर्धेनंतर म्हणाला होता की, त्याच्या फिटनेसने साथ दिली, तर तो आयपीएल 2024 हंगामात खेळताना दिसू शकतो. अशात त्याने आयपीएलच्या 17व्या हंगामासाठीची तयारीही सुरू केली आहे. तसेच, चाहत्यांनाही पुन्हा एकदा त्याच्या धमाकेदार प्रदर्शनाची आशा असेल. (bigg boss winner mc stan meets former legend cricketer ms dhoni watch picture)
हेही वाचा-
नेदरलँड्सने भारताला दिलं मोठं गिफ्ट, दक्षिण आफ्रिकेला हरवून बदलून टाकलं Points Tableचं गणित; वाचाच
दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखल्यानंतर नेदरलँड्सच्या कर्णधाराचे मोठं विधान; म्हणाला, ‘आता आमचे लक्ष फक्त…’