आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणारा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज (24 एप्रिल) 50 वा वाढदिवस आहे. 24 वर्षांपूर्वी सचिनने (Sachin Tendulkar) आपला 25वा वाढदिवस उत्साहात साजरा केला होता. यावेळी त्याने आपल्या 100 शतकांपैकी एक शतक हे आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच केले होते. याचदरम्यान सचिनला 2 अनोख्या भेटवस्तू मिळाल्या होत्या.
यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नच्या (Shane Warne) गोलंदाजीवर तूफान फटकेबाजी करत त्याला आपला ऑटोग्राफ घेण्यासाठी प्रवृत्त केले होते. सचिन आणि वॉर्नमधील वाद जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. परंतु शारजाहमध्ये 24 एप्रिल 1998मध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू वॉर्न सचिनपुढे नमला होता. शेवटच्या 3 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा त्याच्या गोलंदाजीवर तूफान फटकेबाजी झाली होती, हे वॉर्नने स्वत: मान्य केले होते.
भारतीय संघाने सचिनच्या उत्कृष्ट खेळीमुळे शारजाहमधील (Sharjah) तिरंगी मालिका जिंकली होती. यादरम्यान सचिनला मालिकावीर आणि अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले होते. परंतु, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला सर्वात मोठा पुरस्कार हा इतर कोणी नाही तर स्वत: वॉर्नने दिला होता. वॉर्नने आपला शर्ट काढून सचिनला त्यावर ऑटोग्राफ देण्यास सांगितले होते. हा त्या स्पर्धेचा अविस्मरणीय क्षण ठरला होता. यानंतर दुसरा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचे (Australia) तत्कालीन कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) यांनी दिला होता. त्यांनी पुरस्कार वितरणादरम्यान म्हटले होते की, त्यांच्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाने नव्हे तर सचिनने पराभूत केले होते.
सचिनने याचा एका मुलाखतीदरम्यान उल्लेख करत म्हटले होते की, “सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ महत्त्वाचा बनला होता. वॉ म्हणाला होता की, त्यांचा संघ माझ्यामुळे पराभूत झाला होता. हे त्याने त्या दिवशी म्हटले होते, ज्या दिवशी माझा 25 वा वाढदिवस होता. वाढदिवशी यापेक्षा चांगली भेट इतर कोणतीच असू शकत नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये होता. तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने लीग टप्प्यातील चारही सामने जिंकले होते. भारत आणि न्यूझीलंडने एकमेकांविरुद्ध एक-एक सामन्यात विजय मिळविला होता.
भारतीय संघाला आपला शेवटचा लीग सामना 22 एप्रिलला खेळायचा होता. त्यादिवशी शारजाहमध्ये भयानक वादळ आले होते. परंतु मैदानावर कोणी वादळ आणले असेल तर ते सचिनने. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 दिवसांच्या आत 2 द्विशतकी खेळी केल्या होत्या. सचिनला आजही क्रिकेट जगतात ‘डेजर्ट स्ट्रॉम’ म्हणजेच वाळवंटी वादळ या नावाने ओळखले जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सचिन वाढदिवस विशेष लेख –
सचिन ९२वर खेळतोय रे…!!
सतत ऑस्ट्रेलियाला नडणारा मास्टर ब्लास्टर…
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सचिन सचिनसारखाच खेळला
वाढदिवस विशेष: सचिन- क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…
खास आठवण, सचिनचा २०० वा कसोटी सामना आणि मान्यवरांचे ट्विट्स…