भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आज (4 ऑक्टोबर) त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 19 व्या वर्षी त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तसेच भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षक एमएस धोनीचा भारतीय संघात वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. त्याने त्याच्यातील क्षमतेची चुनुकही अनेकदा दाखवून दिली आहे.
अशा या युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल खास गोष्टी-
-रिषभचा जन्म 4 ऑक्टोबर 1997 ला उत्तराखंडमधील हरिद्वार येथे झाला.
-वयाच्या 12 व्या वर्षी तो तारक सिन्हा यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी पालकांसमवेत दिल्लीला स्थायिक झाला. त्यानंतर सिन्हा यांच्या सल्ल्याने राजस्थानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला. तिथे तो 14 आणि 16 वर्षांखालील राजस्थानच्या संघाकडून खेळला. मात्र त्यानंतर त्याला राज्याबाहेरचा असल्याचे सांगुन ऍकॅडमीतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे तो पुन्हा दिल्लीला परतला.
-त्यानंतर त्याने 18 व्या वर्षी दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यात त्याने बंगालविरुद्ध दुसऱ्या डावात 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.
– तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा वासिम जाफर आणि अभिनव मुकुंद नंतरचा तिसराच सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला. तर जगातील चौथा खेळाडू ठरला. त्याने 19 वर्षे 12 दिवसांचा असताना महाराष्ट्राविरुद्ध 2016ला मुंबईत रणजी ट्रॉफी स्पर्धेत 326 चेंडूत 308 धावा केल्या होत्या.
-याबरोबरच रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक करणारा तो केएल राहुल नंतरचा दुसराच यष्टीरक्षक फलंदाज ठरला होता. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तो सातवा यष्टीरक्षक ठरला.
-रिषभ ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टला आदर्श मानतो.
-रिषभ पंतने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचाही विक्रम केला आहे. त्याने नोव्हेंबर 2016 मध्ये झारखंड विरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत 48 चेंडूत शतक करण्याचा विक्रम केला आहे.
-याच सामन्यात त्याने पहिल्या डावात 8 आणि दुसऱ्या डावात 13 असे मिळून 21 षटकार मारले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा तो दुसराच फलंदाज आहे. या यादीत कॉलीन मुनरो अव्वल असून त्याने प्रथम श्रेणीच्या एका सामन्यात 23 षटकार मारले आहेत.
-रिषभ 2016 ला बांगलादेशमध्ये झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला आहे. या स्पर्धेत त्याने सलग तीन अर्धशतके केले आहेत.
-याच विश्वचषकात 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचाही विक्रम रिषभ पंतने आपल्या नावावर केला आहे. त्याने नेपाळ विरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक केले होते. त्याने या सामन्यात 24 चेंडूत 78 धावा केल्या होत्या.
-दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा तो रमण लांबा नंतरचा दुसराच क्रिकेटपटू आहे. त्यांनी 1994 मध्ये 312 धावा केल्या होत्या.
-रिषभने 1 फेब्रुवारी 2017 ला इंग्लंड विरुद्धच्या टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर 2018 मध्ये 18-22 ऑगस्ट दरम्यान नॉटींगघम कसोटीतून इंग्लंडविरुद्धच कसोटी पदार्पण केले आहे.
-कसोटी पदार्पणाच पहिली धाव षटकाराने करणारा रिषभ पहिलाच भारतीय तर जगातील एकूण 12 वा क्रिकेटपटू आहे.
-रिषभने आत्तापर्यंत 33 टी20 सामन्यात 512 धावा आणि 25 कसोटी सामन्यात 3 शतकांसह 1549 धावा केल्या आहेत. तसेच 18 वनडेमध्ये 529 धावा केल्या आहे. 49 प्रथम श्रेणी सामन्यात 8 शतके आणि 15 अर्धशतकांसह 3401 धावा केल्या आहेत.
In August he became the first Indian wicketkeeper to take five catches in his maiden Test innings, and is the only keeper to score a fourth innings century for India!
Happy 21st birthday @RishabPant777! pic.twitter.com/9BqvFi4ZdY
— ICC (@ICC) October 4, 2018
-रिषभ हा कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच डावात यष्टीमागे 5 झेल घेणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला.
MATCH DAY !!
Congratulations to Rishabh Pant on becoming the 291st player to represent #TeamIndia in Test cricket! #ENGvIND #KyaHogaIssBaar #TestCricket @BCCI @ICC @RishabPant777 pic.twitter.com/7MuGSHQU7h— Bhadavi Bandekar (@bhadavibandekar) August 18, 2018
-तसेच रिषभ हा कसोटी सामन्यातील चौथ्या डावात शतक करणारा पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याने हा कारनामा इंग्लंड विरुद्ध सप्टेंबर 2018 मध्ये ओव्हल मैदानावर केला होता.