---Advertisement---

भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

On: मंगळवार, नोव्हेंबर 8, 2022 9:37 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी गोलंदाज ब्रेट लीचा आज 46 वा वाढदिवस आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज खेळाडूंना बाद केले आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण या भारतीय दिग्गजांना अनेकदा तंबूचा रस्ता दाखवला आहे. ब्रेट लीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 700 पेक्षाही अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

अशा या दिग्गज गोलंदाजाबद्दल या काही खास गोष्टी – 

-ब्रेटलीचा जन्म 8 नोंव्हेबर 1976 ला न्यू साउथ वेल्सच्या वोलोंगॅग येथे झाला.

-ब्रेटलीने आपल्या कारकीर्दीची सुरूवात स्थानिक संघाच्या ओक फ्लॅट्स रॅट्स ज्यूनियर संघाकडून केली.

-17वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील ऑस्ट्रेलियन संघासाठी चांगली कामगिरी केल्यामुळे ब्रेटलीला शेफल्ड शिल्डच्या एनएसडबल्यू संघात स्थान मिळाले. ब्रेटलीने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  पदार्पणाच्या सामन्यात त्याने 114 धावात 3 गडी बाद केले.

-ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार स्टीव्ह वॉ एनएसडब्ल्यूकडून लीने केलेल्या कामगिरीवर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याच्या राष्ट्रीय संघातील निवडीसाठी जोर दिला. त्यानंतर ब्रेट लीने 1999  मध्ये भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच त्याची छाप सोडताना पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 अशा मिळून 7 विकेट्स घेतल्या.

-1999- 2000 च्या हंगामात चांगली कामगिरी केल्या बद्दल ब्रेट लीला ‘डाॅन ब्रॅडमन सर्वोत्तम युवा क्रिकेटपटू’चा पुरस्कार मिळाला. त्याने या मोसमात 7 सामन्यामध्ये 42 खेळाडू बाद केले.

-2000 दरम्यान दुखापतींमुळे ली ला जवळ जवळ 1 वर्ष क्रिकेटपासून दूर रहावे लागले. पण त्याने त्यानंतर 2001 च्या अ‍ॅशेस मालिकेत पुनरागमन केले. पण हे खूप कमी कालावधीचे पुनरागमन ठरले. मात्र त्यानंतर त्याने पुन्हा न्यूझीलंड विरुद्ध पुनरागमन करत 3 कसोटी सामन्यात त्याने 14 गडी बाद केले.

– 2003 च्या विश्वचषकामध्ये ब्रेट ली जबरदस्त लयीत होता. त्याने स्पर्धेत 22 बळी मिळवले. यामध्ये केनियाविरुद्ध घेतलेल्या हॅट्रिकचाही समावेश आहे.

-2007 मध्ये, ब्रेट ली टी20 मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याने बांगलादेशविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

-2008 नंतर दुखापतींमुळे त्रस्त झालेल्या लीने 2010मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून 76 सामने खेळताना 310 विकेट्स घेतल्या.

-युवा खेळाडू संघात असतानाही ब्रेट लीने 2011 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळवले. या विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी करताना 13 विकेट्स घेतल्या.

-2012 मध्ये जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळल्यानंतर ब्रेट लीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने 76 कसोटींबरोबरच 221 वनडे आणि 25 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने खेळले. यामध्ये त्याने वनडेत 380 विकेट्स आणि टी20 मध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत.

-ब्रेट ली हा रॉक बँड सिक्स अँड आऊटचा एक भाग आहे, ज्यात माजी क्रिकेटर्स आणि त्याचा भाऊ शेन ली यांचा समावेश आहे.

-ब्रेट लीचा भाऊ शेन ली हा देखील ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. एकेवेळी हे दोघे भाऊ एकत्र ऑस्ट्रेलिया संघात होते.

–  ब्रेट लीने भारतात मेऊसिक फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनचा हेतू आहे की भारतातील प्रत्येक मुलाला संगीताच्या आनंद आणि सामर्थ्याचा अनुभव मिळायला हवा.

– ब्रेट ली हा केवळ चांगला क्रिकेटपटूच नाही तर एक चांगला अभिनेताही आहे. त्याने इंडो-ऑस्ट्रेलियन सिनेमा “अनइंडियन” मध्ये अभिनय केला आहे.

-ब्रेट लीने भारतीय गायिका आशा भोसले यांच्याबरोबर ‘हा मै तुम्हारा हूं’ गाणे गायले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानचा विजयाचा ‘पंच’! मलिकच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांची अफलातून कामगिरी

उपांत्य फेरीचे तिकीट मिळाल्यानंतर आली कॅप्टन केनची प्रतिक्रिया; म्हणाला…

‘या’ कारणाने ‘चॅम्पियन’ ब्राव्होने केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; म्हणाला, “१८ वर्ष…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---