---Advertisement---

बेंगलोर-पंजाब सामन्याला मांजरीनेही लावली हजेरी; सामना थांबवत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी घेतली मजा

Faf-Du-Plessis-And-Mayank-Agarwal
---Advertisement---

पंजाब किंग्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ६०व्या सामन्यात शुक्रवारी (दि. १३ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ५४ धावांनी पराभूत केले. या विजयासह पंजाबने आपल्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. पंजाबने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत २०९ धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला बेंगलोर संघ डळमळताना दिसला. त्यांना निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत फक्त १५५ धावाच करता आल्या. मात्र, या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरले, ते म्हणजे काळी मांजर. पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरच्या डावाच्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूनंतर काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता.

झाले असे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या डावात पंजाबकडून पहिले षटक टाकण्यासाठी फिरकीपटू हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) आला होता. हरप्रीतने आपल्या षटकातील फक्त ३ चेंडू टाकली होती, तेव्हाच स्ट्राईकवर असलेला बेंगलोर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने रनअप घेतलेल्या हरप्रीतला हात दाखवत थांबवले. काही वेळ कोणालाच काही समजले नाही की, डू प्लेसिसने असे का केले? तेव्हाच स्क्रीनवर काळ्या मांजरीला दाखवण्यात आले. ही मांजर साईट स्क्रीनवर आरामात बसली होती. त्यानंतर काही वेळात ती तिथून निघून गेली. हे सर्व पाहून डू प्लेसिसही आपले हसू रोखू शकला नाही. मांजरीचे अनेक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच, नेटकरी याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.

साईट स्क्रीन म्हणजे काय?

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर मांजर जिथे बसली होती, त्याला साईट स्क्रीन म्हणले जाते. आता असा प्रश्न उपस्थित होतो की, साईट स्क्रीन म्हणजे काय? खरं तर, साईट स्क्रीन गोलंदाज आणि पंचांच्या मागे एका भिंतीप्रमाणे असते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ही स्क्रीन काळ्या रंगाची असते. तसेच, कसोटी सामन्यात या साईट स्क्रीनचा रंग पांढरा असतो. ही स्क्रीन फलंदाजांना चेंडूवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करण्यासाठी असते. या भागात प्रेक्षकांना बसण्यासाठी किंवा तिथे फिरण्यासाठी परवानगी नसते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाब संघाचे १२ सामन्यात १२ गुण
बेंगलोरविरुद्धच्या विजयानंतर पंजाब किंग्स संघाने १२ सामन्यात ६ विजयासह १२ गुण मिळवले आहेत. यासोबतच ते आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे, बेंगलोर संघाचे १४ गुण आहेत. मात्र, त्यांचा नेट रनरेट निगेटिव्ह आहे. पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना पुढील २ सामने जिंकावे लागतील.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी आणखी करू तरी काय?’, अवघ्या २० धावांवर तंबूत परतताना विराटची रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद; चाहतेही दु:खी

आयपीएलमधील ६० सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल; पंजाबला प्लेऑफमध्ये एंट्री करण्यासाठी कसे आहे समीकरण?

जे १५ वर्षात कुणाला जमलं नाही, ते बेअरस्टोने करून दाखवलं! दिग्गज जयसूर्याच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---