भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारी २०२१ मध्ये माता-पिता होणार आहेत. गर्भवती असतानाही लॉकडाऊन दरम्यान अनुष्काने स्वत: ला तंदुरुस्त ठेवले आहे. याचा परिणाम म्हणून ती, यावेळीही चित्रीकरण करण्यास सक्षम आहे. अनुष्काने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंवरून पती विराट कोहलीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराट अनुष्काला योगासन शिकवताना दिसतोय.
शीर्षासन करणे खूप कठीण आहे
हा फोटो शेअर करताना अनुष्काने त्याखाली लिहिले की, “शीर्षासन करणे सर्वात कठीण होते. जुने छायाचित्र. योग हे माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. माझ्या डॉक्टरांनी मला सल्ला दिला होता की, मी गरोदरपणाच्या काळात ही सर्व आसने करावी. अधिक वाकणे वगळता अनेक आसने कोणाच्यातरी सोबतीने करता येतात. मागील बऱ्याच वर्षांपासून मी योगासने करत आहे. या आसनासाठी संतुलन साधण्यासाठी मी भिंतीचा आणि माझ्या पतीचा सहारा घेतला. ज्यामुळे मला अधिकची सुरक्षा मिळू शकली.”
https://www.instagram.com/p/CIPlweXJ7mw/?utm_source=ig_web_copy_link
अनुष्काने आपल्या कॅप्शनमध्ये पुढे लिहिले आहे, “या योगसत्रादरम्यान माझी योगशिक्षिका ऑनलाईन व्हिडिओद्वारे आम्हाला मार्गदर्शन करत होती. त्यासाठी मी तिची आभारी आहे. त्यामुळेच मी अजूनही चित्रीकरण करू शकते.”
सध्या विराट भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दुसरीकडे, अनुष्का मुंबईमध्ये राहून आपल्या काही चित्रपटांचे चित्रीकरण करतेय. विराट कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर, आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी भारतात परतेल.
विराटची पालकत्व रजा मंजूर झाली आहे
विराट कोहली सध्या भारतीय संघाचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेतृत्त्व करत आहे. वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाल्याने, भारतीय संघाला मालिका गमवावी लागली. यानंतर, वनडे मालिकेतील तिसरा सामना २ डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जाईल. त्यानंतर, तीन टी२० सामन्यांची मालिका होईल. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला दिवस-रात्र सामना खेळल्यानंतर, विराट मायदेशी परतेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याची पालकत्व रजा मंजूर केली आहे. विराट परतल्यानंतर, उर्वरित तीन सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्त्व करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’
परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज






