---Advertisement---

बोनस क्वीन सोनाली शिंगटे ठरली विजयाची शिल्पकार

---Advertisement---

जयपूर, राजस्थान येथे पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय रेल्वे संघाने दुहेरी मुकुट मिळवला. सलग दुसऱ्यावर्षी पुरुष व महिला दोन्ही संघ राष्ट्रीय स्पर्धेचे विजेते ठरले. महिला संघाच्या विजयात मराठमोळ्या सोनली शिंगटेने मोलाची भूमिका पार पाडली.

अंतिम सामन्यात भारतीय रेल्वे संघ हिमाचलप्रदेश विरुद्ध संघर्ष करत असताना सोनाली शिंगटेने झंझावाती खेळ करत भारतीय रेल्वे संघाला विजय मिळवून दिला. १६-१५ अशी अवघ्या १ गुणांची आघाडी मध्यंतरापर्यत रेल्वेकडे होती. १६-१६ अश्या बरोबरी नंतर रेल्वेचे २ खेळाडु मैदानात शिल्लक होते. मात्र सोनालीने जवळपास तीन मिनिट लोन वाचवत, त्यादरम्यान सलग ५ बोनस गुण मिळवत रेल्वेची आघाडी कायम ठेवली.

रेल्वेकडे ३४-३१ अशी आघाडी असताना हिमाचल प्रदेशच्या तीनच्या कव्हरमध्ये तिसऱ्या निर्णायक चढाईत २ गुण मिळवत सामना रेल्वेकडे झुकावला. त्यानंतर हिमाचलप्रदेशवर लोन पाडत रेल्वे संघाने अजिंक्यपद पटकावले. या सामन्यात सोनालीने १५ चढाईत तब्बल ८ बोनस गुण तर झटापटीत ५ गुण असे मिळवून १३ गुण मिळवले. सोनालीचे बोनस गुण हे सामन्याच्या निकालमध्ये निर्णायक ठरले.

सुरुवातीला महाराष्ट्रकडून खेळणारी सोनाली शिंगटे सध्या भारतीय रेल्वे संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मागील ३-४ वर्षांपासून सोनालीने भारतीय रेल्वे संघात आपला ठसा उमटवला आहे. यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत बादफेरीत सोनालीने स्पर्धेतील उत्कृष्ट खेळ केला. साखळी सामन्यांनंतर सोनालीने आपला खेळ निर्णयाक क्षणी उंचावत रेल्वेला विजेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली.

संपूर्ण स्पर्धेत सोनालीने ६ सामन्यांत मिळून ६८ चढाया केल्या. त्यात १४ बोनस गुणांसह ३२ झटापटीत गुण मिळवले आहेत. तसेच उपांत्यपूर्व व अंतिम सामन्यांत सुपरटेन पूर्ण केला. सोनालीचे पदलालित्य अत्यंत चपळ आहे. किक, टो टच असे अनेक अस्त्र तिच्याकडे आहेत.

सोनालीच्या या उत्कृष्ट खेळांतर पुन्हा एकदा ती भारतीय संघाच दार ठोकावणार यात शंका नाही. मागील दोन राष्ट्रीय स्पर्धेनंतर सोनाली शिंगटेने आशियाई व दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय रेल्वेचा सलग दुसऱ्या वर्षी डबल धमाका; मराठमोळ्या सोनाली शिंगटेचा झंजावाती खेळ

जडेजाला हा फायनलचा सामना खेळवण्यासाठी बीसीसीआयन दिला नकार; जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---