भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिकेचा (India vs Sri Lanka T20) दुसरा आणि तिसरा सामना जगातील सुंदर मैदानांपैकी एक असलेल्या धरमशाला स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. हे सामने २६ आणि २७ फेब्रुवारीला खेळले जाणार आहेत. पहिला टी२० सामना भारतीय संघाने जिंकला. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ धरमशाला (Dharamshala) येथे पोहोचला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघ दुसऱ्या सामन्यावरही आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करेल.
या टी२० मालिकेची सुरुवात भारतीय संघाने विजयाने करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ आणि श्रीलंका संघ बीसीसीआयच्या कडक नियमांतर्गत येथे पोहोचले आहेत. १२:३० वाजता श्रीलंका संघ, ४:३० वाजता भारतीय संघ विमानतळावर पोहोचले आहेत. पूर्वी धरमशाला येथे खेळाडूंचे आगमन होताच त्यांना टिळा लावून आणि त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घालून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जात होते. परंतु यावेळी सर्वच अनुपस्थित होते, ज्याचा सर्वांनाच खेद होता. खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे ते कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येऊ नयेत.
Match Day 🙌
Onto the 2nd @Paytm #INDvSL T20I at Dharamsala 📍#TeamIndia pic.twitter.com/iAGh8FDrwt
— BCCI (@BCCI) February 26, 2022
धरमशालेत होणाऱ्या या सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी सामन्यांमध्ये हवामान विस्कळीत झाले नाही तर उत्तम, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. कारण साधारणतः धरमशाला येथे झालेल्या सामन्यांमध्ये हवामान बदल सतत पाहायला मिळतो. त्यापूर्वी २०२० च्या मार्च महिन्यात झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे देशभरातील आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींना निराश होऊन आपापल्या घरी परतावे लागले होते.
जे लोक शेकडो हजारो किलोमीटर अंतर पार करून सामना पाहायला येतात, ते सामना पाहून माघारी न परतता तेथील पर्यटननगरीला भेट देऊन पैसे वसूल करतात. या स्टेडियमवर तब्बल ४ वर्षांनंतर सामना खेळवला जात आहे. या स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना पार पडला होता, जो श्रीलंकेने जिंकला होता.
भारतीय टी२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, आवेश खान, इशान किशन, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर