सध्या द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. क्रिकेटचा हा नवीन प्रकार चाहत्यांच्या पसंतीचा ठरत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काही ना काही घडत आहे. ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले जाते. या स्पर्धेतील १९ व्या सामन्यात ख्रिस जॉर्डन आणि फिलिप सॉल्ट यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळाले होते.
गुरुवारी (५ ऑगस्ट) या स्पर्धेतील १९ वा सामना मँचेस्टर ओरिजीनल्स विरुद्ध साऊदर्न ब्रेव या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे हा सामना ८५-८५ चेंडूचा खेळवण्यात आला होता. (Chris Jordan took the wicket of Philip salt after got hit for boundries)
या सामन्यात साऊदर्न ब्रेव्ह संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय होता. प्रथम फलंदाजी करताना मँचेस्टर ओरिजीनल्स संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले होते. तसेच या सामन्यात साऊदर्न ब्रेव्ह संघातील गोलंदाज ख्रिस जॉर्डनच्या पहिल्याच षटकातील पहिल्याच तीन चेंडूवर फिलिप सॉल्टने सलग ३ चौकार लगावले होते. परंतु ख्रिस जॉर्डनने स्वतःवर दबाव न घेता, पुढच्याच चेंडूवर त्याने फिलिप सॉल्टला क्विंटन डी कॉकच्या हातून झेल बाद करत माघारी धाडले.
तसेच या सामन्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे हा सामना ८५-८५ चेंडूंचा खेळवला गेला होता. त्यामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. पहिल्या डावातील १४ षटक झाल्यानंतर हा सामना थांबवण्यात आला होता. तोपर्यंत मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने ३ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली होती. मँचेस्टर ओरिजिनल्स संघाकडून कॉलिन मुनरोने ४१ धावांची खेळी केली होती, तर सॅम हेनने नाबाद १२ धावांची खेळी केली.
ख्रिस जॉर्डनची टी२० कारकीर्द
इंग्लंड संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डन याने आतापर्यंत एकूण २३१ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने ११५७ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजी करताना त्याने २४० गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-ENG vs IND, 1st Test, 3rd Day: रॉबिन्सनच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद, भारताच्या ५ बाद १४५ धावा
-खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी
-अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे