भारताचा माजी वेगवान गोलंदाज विनय कुमारची मुंबई इंडियन्सचा टॅलेंट स्काउट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात विनय कुमार हा मुंबई इंडियन्स संघासाठी युवा खेळाडू आणि त्यांच्यातील असलेल्या कलागुणांना शोधण्याचे काम करणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच पार्थिव पटेलची स्काऊट विभागात नियुक्ती झाली होती. त्याचबरोबर आता विनय कुमारची नियुक्ती केली असून मुंबई व्यवस्थापनाने स्काउट विभागाला जास्त बळकट बनवले आहे.
विनय कुमारला युवा खेळाडूंमध्ये असलेल्या कलागुणांना शोधण्याव्यतिरिक्त संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक स्टाफसोबत देखील काम करावे लागणार आहे.
मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानीने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ‘विनय कुमार आपल्या टॅलेंट स्काउट कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. मुंबई इंडियन्सची स्थापना ही युवा खेळाडूंना शोधण्याच्या आणि त्यांना तयार करण्याच्या मजबूत आधारावर करण्यात आली आहे. मला खात्री आहे की, विनय कुमार आपली ही विचारधारा बळकट करतील.’
विनय कुमारने आपल्या १७ वर्षाच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोनदा रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. त्याचबरोबर आपल्या नेतृत्वाखाली कर्नाटक संघाला दोनदा रणजी ट्रॉफीचा किताब मिळवला आहे. तर साल २०१५ आणि २०१७ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स विजेतेपद जिंकले होते, तेव्हा विनय कुमार संघाचा एक भाग होता.
विनय कुमार हा असा निवडक भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. विनय कुमारने एकूण १३९ प्रथम श्रेणी सामन्यात ५०४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर लिस्ट ए मधील सामन्यात विनय कुमारने २२५ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलने शेअर केला बिहाइंड द सीन फोटो, ‘त्या’ व्यक्तीने वेधले सर्वांचेच लक्ष
टी२० मालिकेत पराभूत झाल्यानंतर राणाची भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘लोक माझ्याविषयी बरेवाईट बोलतील…’
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या चहल व गौतमचे काय होणार? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती