ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला अॅडलेडच्या मैदानावरील पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झालेल्या भारतीय संघासाठी पहिला सामना जणूकाही एक दु:स्वप्नच ठरले. त्यातच विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतला असून मोहम्मद शमी दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकणार असल्याने भारतीय संघाच्या अडचणींमध्ये भरच पडली आहे.
मात्र मालिकेतील तीन सामने अजूनही शिल्लक असल्याने पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघ आता कंबर कसून तयार आहे. मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ सरावात घाम गाळत असल्याचे दृश्य दिसून आले. क्रीडा पत्रकार भरत सुंदरेशन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय संघाच्या नेट सेशनमधील काही व्हिडिओ शेअर केले आहेत. भारतीय संघाची दुसऱ्या कसोटीतील संभाव्य प्लेईंग इलेव्हन काय असेल, याचाही अंदाज या व्हिडिओंमधून येतो आहे.
यातील पहिल्या व्हिडिओमधून भारताच्या सलामी फलंदाजांची झलक पाहायला मिळते आहे. शुबमन गिल, मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत असताना यात दिसून येत आहे, तर पृथ्वी शाॅ त्याला संधी मिळण्याची वाट बघतो आहे. त्यामुळे येत्या कसोटीत पृथ्वीच्या जागी शुबमन गिलला संधी मिळेल, अशी शक्यता आहे.
Always a tad tricky to pick up playing XI cues from the nets three days out from a Test match but could this be India’s 1, 2 and 3 at the @mcg? Shubman Gill, Mayank Agarwal & Cheteshwar Pujara while Prithvi Shaw waits his turn for a bat #AUSvIND pic.twitter.com/VQptyLyg55
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 23, 2020
भरत सुंदरेशन यांनी ट्विट केलेल्या अजून एका व्हिडिओत उर्वरित कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार असलेला अजिंक्य रहाणे फलंदाजीचा सराव करत असल्याचे दिसून आले. त्याने मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर आपल्या कौशल्याची चाचपणी केली.
Battle for the third seamer’s slot underway in the far net. Mohammad Siraj and Navdeep Saini bowling to captain Ajinkya Rahane alongside Shardul Thakur #AUSvIND pic.twitter.com/WH1Q0Kv8vA
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 23, 2020
पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक म्हणून प्रथम पसंती मिळालेल्या वृद्धिमान साहाने विशेष कामगिरी केली नव्हती. त्यामुळे सराव सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावलेल्या रिषभ पंतला दुसऱ्या कसोटीत संधी मिळू शकते. पंतदेखील सरावात आपल्या फलंदाजीवर मेहनत घेताना दिसून आला. तसेच फलंदाजीनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह त्याने आपल्या फलंदाजीबाबत चर्चा देखील केली.
Rishabh Pant in the nets before Wriddhiman Saha #AUSvIND pic.twitter.com/tdTd88oKm1
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 23, 2020
याशिवाय डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाही दुखापतीतून सावरत असल्याचे दिसून आले. त्याने काही काळ नेटमध्ये गोलंदाजीचा सराव केल. तसेच कर्णधार विराट कोहलीच्या जागी संधी मिळण्याची शक्यता असलेल्या केएल राहुलनेही नेटमध्ये फलंदाजीचा सखोल सराव केला.
https://twitter.com/beastieboy07/status/1341568796662775808
KL Rahul another Indian batsman with a long stint in the nets #AUSvIND pic.twitter.com/cLX948bMUB
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 23, 2020
त्यामुळे येत्या कसोटी सामन्यात अंतिम अकराच्या संघात कोणाला संधी मिळते हे पाहणे, उत्सुकतेचे असेल. अर्थात ज्यांना संधी मिळेल, त्यांनी त्याचे सोनं करत भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करून द्यावं, अशीच भारतीय चाहत्यांची इच्छा असेल.
महत्वाच्या बातम्या:
– विराट तर गेला, आता पाहू भारतीय संघ कशाप्रकारे उर्जा मिळवणार
– अरुण जेटली स्टेडियमच्या स्टँडवरील माझे नाव तात्काळ हटवण्यात यावे, बिशनसिंग बेदींची धक्कादायक मागणी
– ऐकावं ते नवलंच! चक्क प्रखर उन्हामुळे थांबला न्यूझीलंड-पाकिस्तान सामना; चाहत्यांनी उडवली खिल्ली