---Advertisement---

यजमान इंग्लंड की पाहुणा भारत, कोण मारणार कसोटी मालिकेत बाजी? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर

On: मंगळवार, जुलै 6, 2021 5:25 PM
---Advertisement---

येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे.या मालिकेपूर्वी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपले मत मांडले आहे. या मोठ्या मालिकेत कुठला संघ बाजी मारेल याबाबत माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने देखील भविष्यवाणी केली आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर नेटकऱ्यांशी चर्चा करत असतो. नुकताच त्याला ट्विटरवर ह्यूज मेकलॉईड नावाच्या एका यूजरने विचारले होते की, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या मालिकेत कुठला सांघ बाजी मारेल.

याबाबत बोलताना हॉग लिहिले की, ‘भारतीय संघाकडे स्वतःला सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे. कारण, आता इंग्लंड संघातील फलंदाजांमध्ये ती स्थिरता दिसून येत नाही. त्यामुळे भारताकडे यजमानांना त्यांच्या मायदेशात पराभूत करण्याची मोठी संधी आहे.'(brad hogg prediction on india vs england test series)

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला ४ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना १० सप्टेंबर रोजी ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये खेळला जाणार आहे.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठी विश्रांती मिळाली आहे. या कालावधीत भारतीय खेळाडूंना ताजातवाना राहण्यासाठी काही दिवसांचा ब्रेक दिला असून त्यांना १४ जुलैपर्यंत पुन्हा एकत्र येण्यास सांगितले आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सरावाला सुरुवात होईल.

इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर

महत्वाच्या बातम्या-

‘चांगली कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षकाला हटवण्याची गरज नाही’, रवी शास्त्रींना दिग्गज कर्णधाराची साथ

आयपीएल नव्हे, तर ‘या’ टी२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार पठाण बंधू

महिलांच्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीपूर्वी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केली ‘ही’ विशेष मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---